'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण होत आहे. दोघे एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सावनीच्या लग्नाची तयारी सुरु असताना हर्षवर्धनला मिहिका आवडू लागली आहे. तो आता सावनी सोडून मिहिकाच्या मागे लागला आहे. हे जेव्हा मुक्ताला कळेल तेव्हा काय होणार? हे पाहण्यासारखे आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सावनीने लग्नाची घोषणा करण्यासाठी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यापासून होते. या पत्रकार परिषदेसाठी सर्व तयारी करण्यात येते. पण हर्षवर्धन मात्र गैरहजर राहातो. सावनी त्याची वाट पाहात असते, त्याला फोन करत असते पण हर्षवर्धन मात्र उचलायचे नाव घेत नाही. शेवटी आलेले लोक नाराज होऊन आणि सावनीला सुनावून निघून जातात.
वाचा: प्रभास आणि दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट कसा आहे? वाचा रिव्ह्यू
मुक्ता आणि सागर हे डेटवर गेलेले असतात. ते दोघे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात दिसतात. सागर मुक्ताला वेगवेगळे सरप्राईज देतो आणि मुक्ता देखील ते पाहून खूश होते. घरी येत असताना मुक्ताची चप्पल तुटते. सागर तिला चांगले ऐकवतो. काही तरी ब्रँडेड घ्या मग तुटणार नाही असे देखील तो बोलतो. मुक्ताला चालता येत नाही हे पाहून सागर तिला उचलून घेतो आणि घरी जातो. हे सगळं सावनी पाहाते. तिचा जळफळाट होतो. मुक्तासोबत सगळं कसं चांगलं होतय असा प्रश्न तिला पडतो.
वाचा: 'संसदेत गदारोळ झाला होता', शर्मिला टागोर यांच्या बिकिनी फोटोशूटवर पतीची काय होती प्रतिक्रिया?
मिहिका ज्या इवेंट कंपनीसाठी काम करत असते ती इवेंट कंपनी सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाची व्यवस्था करणार असते. त्यामुळे मिहिकाला हर्षवर्धनच्या सतत घरी जावे लागत आहे. मिहिकाचे वागणे बोलणे हर्षवर्धनला आवडू लागले आहे. मिहिका लग्नाच्या कार्यक्रमाचा प्लान द्यायला घरी येणार असते. त्यामुळे हर्षवर्धन घरातील सगळ्या नोकरांना जायला सांगतो. मिहिका कामाचे प्रेझेंटेशन देत असताना हर्षवर्धन तिच्या ज्यूसमध्ये गुंगीच्या गोळ्या मिसळतो. पण तेवढ्यात मिहिकाला मुक्ताचा फोन येतो. आता हर्षवर्धन मिहिकाचा फायदा घेणार का? मिहिका मुक्ताच्या फोननंतर घरी जाणार का तिथेच थांबणार? हे सगळं मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
वाचा: बॉडीगार्डची 'ती' चूक नागार्जुनने सुधारली, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
संबंधित बातम्या