मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सागरने सांगितले आदित्यते सत्य, काय असणार मुक्ता आणि माधवीची प्रतिक्रिया? ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये काय घडणार

सागरने सांगितले आदित्यते सत्य, काय असणार मुक्ता आणि माधवीची प्रतिक्रिया? ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये काय घडणार

Aarti Vilas Borade HT Marathi
May 27, 2024 12:46 PM IST

अखेर सागरने मुक्ता आणि माधवीला आदित्यचे सत्य सांगितले आहे. त्यामुळे 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय घडणार? वाचा

Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका कायमच चर्चेत असते. या मालिकेतील सागर आणि मुक्ताने प्रेक्षकांच्या मनात घर करत टीआरपी यादीमध्ये देखील स्थान पटकावले आहे. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आदित्यने माधवीचा अपघात केला आणि या सगळ्याचा सावनी फायदा घेताना दिसत आहे. पण आता शेवटी सागरने सर्वांना सत्य सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुक्ता हर्षवर्धनसोबत पोहोचली सावनीच्या घरी

हर्षवर्धन मुक्ताच्या क्लिनिकमध्ये जातो. तो तिला सतत सावनी आणि सागरमध्ये काही तरी सुरु असल्याचे सांगतो. मुक्ता सतत त्याचा अपमान करते तरी देखील हर्षवर्धन काहीही ऐकायला तयार नसतो. शेवटी मुक्ता हर्षवर्धनच्या घरी जाण्यास तयार होते. सावनी आणि हर्षवर्धन किती चुकीचे आहेत हे दाखवण्यासाठी मुक्ता घरी जाते.
वाचा: कोण आहे संजय लीला भन्साली यांची बहिण बेला सेहगल आणि शर्मिनची आई? वाचा

मुक्ताने उचलला सावनीवर हात

सावनीने सागरच्या ड्रींकमध्ये काही तरी मिसळलेले असते. त्यामुळे त्याला गुंगी चढलेली असते. अशा अवस्थेत सावनी सागरला किस करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात मुक्ता तेथे पोहोचते. सागरची आवस्था पाहून मुक्ताची प्रचंड चिडते आणि सावनीला खूप सुनावते. तुमचा हा डाव मला कळत नाहीये का? पण माझा माझ्या सागरवर पूर्ण विश्वास आहे असे मुक्ता ठणकावून सांगते. ती सागरला तेथून घेऊन जाते.
वाचा: आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्र, 'या' नाटकात साकारणार भूमिका

सागरने सांगितले सत्य

हर्षवर्धनने मुक्ताला माधवीचा अपघात हा सावनीने केला असल्याचे सांगितले. पण मुक्ताला त्यावर विश्वास बसत नाही. शेवटी मुक्ता सागरला शुद्धीत आल्यावर हा अपघात सावनीने केला आहे का? असे विचारले. त्यावर सागरने हा अपघात सावनीने केला नसून आदित्यकडून झाला आहे असे खरे उत्तर दिले आहे. त्यानंतर सागर मुक्ताचे आई-वडील माधवी आणि पुरु यांच्याकडे जातो. तो त्यांना अपघात आदित्यने घडवून आणला असल्याचे सांगतो. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. आता मालिकेच्या आगामी भागात मुक्ता आदित्यला माफ करेल का? माधवी आदित्यला शिक्षा देणार का? या प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
वाचा: बॉलिवूड कलाकारांवरही भारी पडली मराठमोळी छाय कदम, 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये झाले 'या' सिनेमाचे स्क्रिनिंग

टी-२० वर्ल्डकप २०२४