Premachi Goshta: इंद्राने पहिल्यांदाच देणार मुक्ताला पाठिंबा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: इंद्राने पहिल्यांदाच देणार मुक्ताला पाठिंबा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Premachi Goshta: इंद्राने पहिल्यांदाच देणार मुक्ताला पाठिंबा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 27, 2024 09:39 AM IST

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या एक वेगळे वळण आले आहे. या मालिकेत हर्षवर्धनने मिहिकाला मोहरा बनवून लग्न मोडले आहे. त्यानंतर मुक्तावर होणारे आरोप पाहून इंद्रा पहिल्यांदाच मुक्ताच्या पाठीशी उभी आहे.

Premachi Goshta
Premachi Goshta

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सतत काही ना काही घडत असते. सावनीचे लग्न पार पडणार असते तेवढ्यात हर्षवर्धन नवा डाव आखतो. पण त्याच्या या डावामुळे मिहिकावर परिणाम होतो. तो महिकाचा मोहरा म्हणून वापर करतो. आता 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार चला पाहूया...

सावनीने केले मुक्तावर आरोप

हर्षवर्धनने लग्नाला नकार दिल्यामुळे सावनी चिडते. ती मुक्ताला सतत तिने हे मुद्दाम केल्याचे बोलते. तसेच तुझी बहिण मिहिकाला तर मी सोडणार नाही असे ती बोलते. मुक्ताला हे सगळं पाहून धक्का बसतो. तिच्या तोंडातून एक अक्षरही निघत नाही. सावनी मुक्तावर हात उगारते. तेवढ्यात सागर पुढे येतो आणि सावनीला थांबवतो. तो तिला स्पष्ट शब्दात बजावतो, 'मुक्ता माझी बायको आहे. ती कधीही खोटं बोलत नाही. तिच्यावर हात उचलण्यापूर्वी विचार कर.' ते ऐकून सावनी आणखी चिडते. ती सागरला म्हणते, 'आज तुला माझी किव यायला हवी होती. पण नाही नेहमी तू तुझ्या बायकोची बाजू घेतोस. तिला देखील हे सगळं भोगावं लागेल.'

सावनीने घेतले स्वत:ला कोंडून

हर्षवर्धनला जे हवं होतं ते तसच झालं. त्याला सावनीशी लग्न करायचे नव्हते. त्यामुळे तो हा सगळा डाव आखत होता. शेवटी त्याने सावनीशी लग्न मोडले आहे. तो मांडवातून निघून जात असताना सावनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र, तो काहीही ऐकायला तयार नसतो. तो तेथून निघून जातो. शेवटी सावनी पळत जाते आणि स्वत:ला खोलीमध्ये कोंडून घेते. आदित्य तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण सावनी कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो.

सागर आणि मिहिरने उचलला हर्षवर्धनवर हात

हर्षवर्धनमुळे मिहिकाला प्रचंड त्रास होतो. तिला धक्का बसल्याचे दिसत आहे. ते पाहून सागरला रहावले नाही. तो मिहिरला घेऊन हर्षवर्धनच्या घरी जातो. तेव्हा हर्षवर्धन मित्राशी बोलत असतो की, 'मी मिहिकाला या घराचे माप ओलांडायला भाग पाडतो की नाही पाहा.' तेवढ्यात सागर आणि मिहिर तेथे पोहोचतात. मिहिर हर्षवर्धनची कॉलर पडकून त्याला सुनावतो. सागर देखील त्याला चांगलाच चोप देतो. पण हर्षवर्धनला काही फरक पडत नाही.
वाचा: 'माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं', बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती वडिलांची प्रतिक्रिया

दुसरीकडे सावनीचे लग्न मुक्तामुळे मोडले असल्यामुळे महिलांचा एक मोर्चा कोळी कुटुंबीयांच्या दारात येतो. ते मुक्ताला काळे फसणार असतात. तेवढ्यात इंद्रा तेथे येते आणि सर्वांना लांब होण्यास सांगते. माझ्या मोठ्या सुनेला जर कोणी हात जरी लावला तर माझ्याशी गाठ आहे असे ती बोलताना दिसते. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत,

Whats_app_banner