स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. सतत मुक्ताच्या बाजूने उभे असणारे कोळी कुटुंबीय एका झटक्यात मुक्ता विरोधात उभे दिसत आहेत. लकी हा आरतीच्या बाळाच्या बाप होणार आहे हे सत्य मुक्ताने सर्वांसमोर आणले. पण तरीही कोळी कुटुंबीय मुक्ताला दोषी ठरवत आहेत. सागर देखील मुक्ताच्या बाजूने उभा नाही. यावेळी सागरने केलेल्या कृत्याने मुक्ताला मोठा धक्का बसला आहे. चला जाणून घेऊया आज मालिकेच्या भागात काय होणार आहे.
'प्रेमाची' गोष्ट मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ता लकीच्या डीएनए टेस्टचे रिपोर्ट्स सर्वांसमोर घेऊन येते. आशू या सगळ्यात मुक्ताची मदत करतो. तो थेट डॉक्टरांना घेऊन कोळी कुटुंबीयांच्या घरी पोहोचला आहे. सर्वांसमोर सत्य आल्यानंतरही इंद्रा कोणाचेही ऐकायला तयार नसते. मुक्ता इंद्राकडे विनंती करते की आरतीला न्याय मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. पण ऐकेल ती इंद्रा कसली.
लकीचे सत्य समोर आल्यानंतर सागर त्याला चांगलाच चोप देतो. तो सर्वांसमोर लकीला ऐकवतो. नंतर तो मुक्ताची माफी मागतो. पण मुक्ता त्याचे ऐकून घेऊन तेथून निघून जाते. सागर मुक्ताची पुन्हा कान पकडून माफी मागतो पण मुक्ता त्याच्याही एकही शब्द बोलत नाही. मुक्ताला सागरचे वागणे पटलेले नसते.
या सगळ्या प्रकरणात आरतीची चूक आहे असे लकी इंद्राला पटवून देतो. सावनी देखील लकीला हा प्लान सांगते. लकी इंद्राच्या खोलीत जातो तेव्हा इंद्रा त्याला मारताना दिसते. का केलीस एवढी मोठी चूक असे बोलताना दिसते. पण नंतर लकी गोड बोलून सगळी चूक आरतीची असल्याचे इंद्राला पटवून देतो. सावनी देखील तेथे येते आणि स्वातीच्या वेळी देखील आरतीमुळेच सगळं झालं होतं असे बोलते. इंद्राला दोघांचे म्हणणे पटते. ती बाहेर येऊन सागरला हे प्रकरण विसरुन जाण्यास सांगते.
वाचा: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या ऑस्कर प्रवेशाचा दावा खोटा? FFIच्या अध्यक्षांनी सांगितले सत्य
सागर यावेळी सत्याची बाजू घ्यायची सोडून लकीची आणि कुटुंबीयांचे ऐकतो. तो हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो आरतीला ब्लँक चेक देतो. आरती रागात मुक्ताला फोन करते आणि घडलेला प्रकार सांगते. मुक्ता सागरला जाब विचारायला जाते. सागर काही बोलणार तेवढ्यात मुक्ताला चक्कर येते. आता मुक्ताला नेमकं काय झाले हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.