मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: सागरसाठी मुक्ताने केला मेकओवर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रोमँटिक वळण

Premachi Goshta: सागरसाठी मुक्ताने केला मेकओवर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रोमँटिक वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 26, 2024 01:07 PM IST

Premachi Goshta Serial Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. मालिकेत सागर आणि मुक्ताचा रोमँटिक ट्रॅाक पाहायला मिळत आहे.

Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रोमँटिक वळण
Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रोमँटिक वळण

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. एकीकडे सावनी हर्षवर्धनच्या मागे लग्नासाठी हात धुवून लागली आहे. दुसरीकडे हर्षवर्धनला हे लग्न करायचे नसते त्याला मिहिका आवडू लागली आहे. तिसरीकडे मुक्ता आणि सागरमध्ये जवळीक निर्माण होत आहे. त्यामुळे मालिकेचा आजचा भाग अतिशय रंजक वळणावर पोहोचला आहे. मुक्ताने सागरसाठी मेकओवर केला आहे.

आदित्य सावनीकडे केला हट्ट

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी ही गेल्या काही दिवसांपासून आदित्यला घेऊन मुक्ताच्या घरी राहात आहे. माधवीला हे आवडत नसले तरीही ती मिहिकाची होणारी नणंद असल्यामुळे ती तयार होते. पण माधवी सावनीला तिची कामे स्वत: करायला लावते. आजच्या भागाच आदित्यला कांदा बटाटे पोहे खायचे असतात. सावनी नाटक करत ते बनवण्यासाठी स्वयंपाक घरात जाते. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते म्हणून ती गॉगल लावून कांदा कापते. पोहो शोधताना सावनीच्या डोक्यावर चक्क पिढाचा डब्बा पडतो. त्यानंतर सावनीचा झालेला अवतार पाहून आदित्य आणि माधवीला हसू अनावर होते.
वाचा: शर्वरी वाघचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' होणार ओटीटीवर प्रदर्शित? वाचा कधी आणि कुठे

हर्षवर्धनला मिहिका आवडली

हर्षवर्धन आणि सावनीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी एका इवेंट मॅनेजर कंपनीवर सर्व जबाबदारी टाकण्यात आली आहे. या कंपनीसाठी मिहिका काम करत असते. मिहिकाला पाहून हर्षवर्धन तिच्यावर फिदा होता. त्याला सावनीशी लग्न करण्यात काहीच रस नसतो. तो आता मिहिकाच्या मागे लागला आहे. पण याची कल्पना कोणालाही नाही. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: 'या' कारणामुळे वर्षातून ६ महिने आईसोबत एका घरात राहते सई ताम्हणकर

ट्रेंडिंग न्यूज

सागरने मुक्ताला दिले सरप्राईज

मुक्ता क्लिनिकमधून घरी येते तेव्हा तिला एक चिठ्ठी सापडते. अशाच चार त पाच चिठ्ठ्या सागरने लिहून ठेवलेल्या असतात. त्याने या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून मुक्ताला डिनर डेटसाठी विचारले आहे. तसेच प्रत्येक चिठ्ठीमध्ये मुक्ताला रात्रीच्या डेट नाईटसाठी तयार होण्यासाठी खास गिफ्ट दिले आहे. शेवटी मुक्ताला तो ड्रेस देखील आवडतो. मुक्ता खूप खूश असते. पण तिला प्रश्न पडतो की बापू आणि इंद्रासमोर हा ड्रेस घालून कसे जायचे. स्वाती तिला समजावते. शेवटी मुक्ता तो वनपिस घालून डिनर डेटवर जाते. मुक्ताचा हा मेकओवर सगळ्यांना आवडला आहे.
वाचा: तरुणपणी अभिनेता सुबोध भावे कसा दिसत होता? 'तू भेटशी नव्याने' मालिकेतील नवे फोटो व्हायरल

WhatsApp channel