'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत सावनी सागरशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सागरचे मुक्तावर प्रेम असल्यामुळे तो सावनीकडे फार लक्ष देत नाही. तरीही सावनी त्यांचा मुलगा आदित्यचा वापर करुन सतत सागरला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं सुरु असलं तरी मुक्ताचा सागरवर पूर्ण विश्वास आहे. ती कोणताही वेगळा विचार मनात आणत नाही. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय होणार...
माधवीला आता बरे वाटत असते. मिहिर, मिहिका आणि मुक्ता तिची सतत काळजी घेताना दिसतात. नुकताच माधवी गुरुजींना घरी बोलावण्याचा आग्रह करते. आता माधवी मिहिकाचे लग्न लावू देणार हे ऐकून पुरुला आणि मुक्ताला धक्का बसतो. पण माधवी मिहिकाचे लग्न मिहिरशी लावून देणार असल्याचे समोर येते. ते ऐकून सर्वजण आनंदी होतात. मुक्ता ही आनंदाची बातमी देण्यासाठी सागरला फोन करते. सागर देखील आनंदी होतो. ते दोघे मुक्ताच्या क्लिनिकमध्ये भेटणार असतात. सागर मुक्ताला क्लिनिकमध्ये भेटून सर्व काही सत्य सांगणार असतो. पण आलेल्या पेशंटमुळे ते राहून जाते.
वाचा: 'फॅमिली मॅन ३' सीरिजमध्ये शरद केळकर दिसणार की नाही?, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा
माधवीच्या अपघाताची केस कुठपर्यंत आली हे पाहण्यासाठी मिहिका वकिलांना फोन करते. तेव्हा तिला कळते की माधवीची केस दाखलच करण्यात आलेली नाही. ती तातडीने मुक्ताला फोन करते आणि सांगते. मुक्ताला खरं तर ऐकून धक्का बसतो. ती सागर खोटं का बोलला याचा विचार करते.
वाचा: कभी नहीं मारा चौका तो बाद में नहीं मिलेगा मौका; "होय महाराजा"चा मजेशीर ट्रेलर पाहिलात का?
हर्षवर्धन दात दुखीचा बहाणा करुन मुक्ताच्या क्लिनिकमध्ये येतो. तो येईन मुक्ताशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो पण मुक्ता त्याचा चांगलाच पाणउतारा करते. तरीही हर्षवर्धन तेथे थांबून सागर आणि सावनीमध्ये काही तरी सुरु असल्याचे मुक्ताला सांगतो.
वाचा: ‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये महेश मांजरेकर का करणार नाहीत सूत्रसंचालन? समोर आलं मोठं कारण!
आदित्यसोबत बाहेर जायचे असल्यामुळे सागर सावनीच्या घरी जातो. तेथे सावनी त्याला जबरदस्ती एक ड्रींक प्यायला देते. ते प्यायल्या नंतर सागरला चक्कर येते, सगळे अंधूकअंधूक दिसायला लागते. सावनी याच गोष्टीचा फायदे घेते आणि सागरशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ती सागरला किस करणार असते तेवढ्यात मुक्ता तेथे पोहोचते आणि तिच्या कानशिलात लगावते. आता मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या