Premachi Goshta : सागरने मुक्तासाठी आणला नवा वनपिस, तो पाहून सावनीचा झाला जळफळाट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta : सागरने मुक्तासाठी आणला नवा वनपिस, तो पाहून सावनीचा झाला जळफळाट

Premachi Goshta : सागरने मुक्तासाठी आणला नवा वनपिस, तो पाहून सावनीचा झाला जळफळाट

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 25, 2024 10:39 AM IST

Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या रोमँटिक वळण आले आहे. सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण झाल्याचे दिसत आहे.

premachi goshta: सागरने मुक्तासाठी आणलेला वनपिस सावनीने खराब केला
premachi goshta: सागरने मुक्तासाठी आणलेला वनपिस सावनीने खराब केला

'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सर्वांची आवडती मालिका आहे. या मालिकेत सागर कोळी आणि मुक्ता गोखलेची लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत रोमँटिक ट्रॅक सुरु आहे. पण सागरची पहिली पत्नी सावनीला हे सर्व पाहून जळफळाट होत आहे. ती सतत मुक्ताला कसा कमीपणा दाखवता येईल याचा प्रयत्न करत असते. चला पाहूया मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?

सावनी ड्रेसवरुन केला ड्रामा

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात सावनी तिच्या लग्नाची तयारी करताना दिसत आहे. तिने लग्नाच्या रिसेप्शनला मागवलेला ड्रेस हा घरी येतो. पण तिला तो ड्रेस अजिबात आवडलेला नाही. त्यामुळे ती ड्रेस घेऊन आलेल्या मुलीवर प्रचंड चिडते. तिला तुझे करिअर सुरु होण्याआधीच संपवेन अशी धमकी देते. ते पाहून मुक्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करते. पण ती मुक्तालाच काकू बाई बोलते.
वाचा: लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा स्विकारणार का मुस्लिम धर्म? जहीरच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया

सागरने सुनावले सावनीला

सावनी मुक्ताला वाटेल तसे बोलत असते तेवढ्यात सागर तेथे येतो. तो सावनीला तोंड सांभाळून बोल असे म्हणते. तसेच मुक्ता आज जे काही खरेदी करते ते स्वत:च्या खर्चाने घेते. ती स्वत:च्या पायावर उभी आहे. ती तुझ्यासारखी कोणाच्या पैशांवर आधारित नाही असे सागर बोलतो. ते ऐकून सावनीचा जळफळाट होतो. तरीही ती मुक्ताला सुनावते की तुझ्या सेकंड हँड हसबंडसोबत माझ्या रिसेप्शनला ये. ते ऐकून सागर आणखी चिडतो.
वाचा: जमिनीवर बसून अनिल कपूरचा सोनाक्षीसोबत डान्स, जहीरने छैय्या-छैय्यावर डान्स करत केले इम्प्रेस

सागरने मुक्तासाठी खरेदी केला डिझायनर ड्रेस

सागरने सध्याच्या प्रसिद्ध डिझायनरकडून मुक्तासाठी ड्रेस खरेदी केला आहे. सावनीला तो ड्रेस पाहून तिच्यासाठीच हर्षवर्धनने मागवला असल्याचे वाटते. पण सागर तेवढ्यात तेथे येतो आणि हा ड्रेस मुक्तासाठी असल्याचे सांगतो. तो सुंदर ड्रेस पाहून सावनीचा जळफळाट होतो. इतका सुंदर ड्रेस फक्त मीच घालू शकते असे बोलते. त्यानंतर ती कात्री घेऊन मुक्ताचा तो ड्रेस कापून टाकते. अजून याबाबत मुक्ता आणि सागरला काहीच माहिती नाही. जेव्हा सागरला याविषयी कळाले तर तो कशी प्रतिक्रिया देणार? हे येत्या भागात कळणार आहे.
वाचा: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रिसेप्शनला नेसली लाल रंगाची साडी, किंमत ऐकून बसेल धक्का

Whats_app_banner