Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सागर आणि मुक्ताची जोडी प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. पण या जोडीला सावनी नावाचे ग्रहण सतत लागत असते. सावनी सागर आणि मुक्ताला वेगळ्या करण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसत आहे. पण तिचे प्रयत्न मुक्ताने कायम अपयशी ठरवले आहेत. आता सागर स्वत:हूनच मुक्ताच्या लायक नसल्याचे ठरवतो आणि कुठे तरी लांब जाण्याचा निर्णय घेतो. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सागर रात्री घरी न आल्यापासून होते. मुक्ता सागरवर असलेल्या प्रेमाची कबुली देणार असते. पण सागर रात्रभर घरी येत नाही. तो सकाळी घरी येताच मुक्ताला बसून झोपलेले पाहातो. त्याला वाईट वाटते. पण तो मुक्ताशी न बोलताच निघून जातो.
सकाळी सर्व काही आवरुन सागर सिंगापूरला जायला निघतो. सर्वजण त्याला जाताना त्याच्याशी बोलतात. इंद्रा थोडी भावनिक होते. मुक्ता सागरला आणलेले गिफ्ट आणायला आत जातो. तो पर्यंत सागर निघून पण जातो. मुक्ताला धक्का बसतो की सागर असा का वागत आहे? पण ती दुर्लक्ष करते.
सागर गेल्या नंतर मिहिर त्याच्या ऑफिसमध्ये जातो. तेवढ्यात त्याला घटस्फोटाचा आणि सगळी संपत्ती मुक्ताच्या नावावर केल्याचे पेपर सापडतात. तो ते घेऊन घरी येतो. तो सर्वांना सागर कायमचा सोडून गेल्याचे सांगतो. ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. तसेच मुक्ताला घटस्फोटाचे पेपरही दाखवतो. त्यानंतर मिहिर सागरची फ्लाईट संध्याकाळी असल्याचे सांगतो. त्यामुळे मुक्ता पळत जाते.
वाचा: एका क्रिकेट मॅचमुळे गेला 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जीव, वाचा नेमकं काय झालं
मुक्ता सागरची फ्लाईट मध्यरात्री असल्याचे कळते. त्यामुळे ती घटस्फोटाचे पेपर घेऊन पळत एअरपोर्टवर जायला निघते. मध्येच तिला एका गार्डनची आठवण येते. या गार्डनमध्ये सागर बसलेला असतो. मुक्ता त्याच्याकडे जाते आणि घटस्फोटाचे पेपर फाडून टाकते. पुन्हा असे काही करु नको असे देखील बोलते. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
संबंधित बातम्या