Premachi Goshta: सागरने केले घटस्फोटाचे पेपर तयार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: सागरने केले घटस्फोटाचे पेपर तयार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Premachi Goshta: सागरने केले घटस्फोटाचे पेपर तयार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 23, 2024 03:15 PM IST

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आता सागर मुक्ताला कायमचा सोडून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो मुक्ताला घटस्फोट देत आहे.

premachi goshta
premachi goshta

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. मुक्ता आणि सागरला वेगळे करण्याचा सावनीचा डाव यशस्वी होत आहे. ती सतत सागरला तू मुक्तासाठी योग्य नाहीस हे सांगत असते. आता सागरलाही ते खरे वाटायला लागले आहे. त्यात सागरने मुक्ता आणि आशयवर संशय घेतल्यामुळे आणखी गोष्टी विचित्र झाल्या. त्यामुळे सागरला पश्चाताप होत आहे. तो मुक्ताला आता कायमचे सोडून जाणार आहे. पण याबाबत अद्याप कोणाला माहिती नाही. तसेच सागरने मुक्ताला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सागर सर्व संपत्ती मुक्ता आणि सईच्या नावावर करताना होते. सागर सर्वांना सोडून सिंगापूरला स्थायिक होणार असतो. त्यामुळे मुक्ता आणि सईच्या नावावर सर्व गोष्टी करतो. तसेच वकीलांना सर्व कागदपत्र मुक्ताला मी इथून गेल्यावर देण्यास सांगतो.

मुक्ताचा नावावर केली सगळी संपत्ती

मुक्ताल घरातील सर्वांची काळजी घेते. ते सतत सर्वांसाठी काही ना काही करताना दिसते. मुक्ता घरातील सर्वांसाठी जेवण बनवते आणि शिल्लक राहिलेले ती खाते. हे पाहून इंद्रा मुक्ताचे कौतुक करते. ती मुक्ता जे काही करते ते योग्य असते असे बोलत असते. ते सागर ऐकतो आणि तेथून निघून जातो. मुक्ता सागरच्या मागे पळण्याचा प्रयत्न करते. पण मधेच सई तिला आवज देते. त्यामुळे मुक्ता थांबते. सागरला भरून येते.

सावनीने केला चोरी करण्याचा प्रयत्न

सागरने पैसे आणि पेपर हे तिजोरीमध्ये ठेवलेले असतात. सावनी ते पाहाते. ती तिजोरी उघडते आणि ते पैसे घेण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात मुक्ता येते. त्यामुळे सावनी तेथून पळ काढते. आता मुक्ताला सावनी घरात चोरी करत असल्याचे कळणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: त्याने मला बेडरुममध्ये बोलावले अन्...; सोनालीने संजय दत्तसोबतच्या त्या सीनवर केले वक्तव्य

सागरने केले घटस्फोटाचे पेपर तयार

सागरच्या मनाता सारखी एकच गोष्टी असते की त्याच्यामुळे मुक्ताला त्रास होत आहे. त्यामुळे सागरला मुक्तापासून लांब जायचे आहे जेणेकरुन मुक्ता आनंदी राहणार. त्यासाठी सागर घटस्फोटाचे पेपर तयार करतो आणि फ्लाईट पकडण्यासाठी निघून जातो. मुक्ताच्या हाती ते पेपर लागतात. आता मुक्ता काय करणार? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner