मुक्ताने वाचवला आदित्यचा जीव, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी सागरसमोर केला नवा ड्रामा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुक्ताने वाचवला आदित्यचा जीव, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी सागरसमोर केला नवा ड्रामा

मुक्ताने वाचवला आदित्यचा जीव, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी सागरसमोर केला नवा ड्रामा

Aarti Vilas Borade HT Marathi
May 23, 2024 03:28 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. आदित्य घरातून पळून गेल्यामुळे सावनीने एक नवा ड्रामा केला आहे. आजच्या भागात मालिकेत काय होणार चला जाणून घेऊया..

Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात कोळी आणि गोखले कुटुंबीयामध्ये अपघाताविषयी बोलणे सुरु असते. ते ऐकून आदित्य घाबरतो. त्याला भीती वाटते की या सगळ्यामुळे त्याला तुरुंगात तर जावे लागणार नाही ना. त्यामुळे आदित्य घरातून पळातून जातो. ते कळताच सावनी नवा ड्रामा करते. ती सतत मुक्ताला या सगळ्या घटनेला दोषी ठरवत असते. सागर तिला सुनावतो. पण ती ऐकल तर सावनी कसली. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय होणार?

सावनीने केले मुक्तावर आरोप

आदित्य घरातून पळून जाताच सर्वजण चिंता व्यक्त करतात. लकी आणि सागर आदित्यला शोधण्यासाठी बाहेर जातात. मुक्ता देखील सगळीकडे आदित्यला शोधत असते. पण आदित्य कुठेही सापड नाही. सागरला तेवढ्यात सावनीचा फोन येतो. तो आदित्य हरवला असल्याचे सांगतो. सावनी कोळी कुटुंबीयांकडे पळत येते. ती रागाच्या भरात मुक्ताला वाटेल तसे बोलते. माझ्यावरील राग काढण्यासाठी मुक्ताने आदित्यला काही केले असेल असे आरोप करते.
वाचा: अभिनेत्री स्पृहा जोशीच्या आयुष्यात आहेत दोन सुपरहिरो, जाणून घ्या ते कोण?

इंद्रा देखील मुक्तावर चिडली

इंद्रा मुक्ताला आदित्य कुठे आहे असा प्रश्न विचारते. तू आदित्यला आपले कधी मानले नसल्याचा आरोप करते. इंद्राच्या बोलण्यावर बापू नाराजी दर्शवतात आणि वेळ काय, बोलतेय काय? काऊंसलिंगच्या नावाखाली आदित्यला इथे आणले असे सावनी म्हणते. बारशाचा कार्यक्रम संपल्यावर आदित्यला मुद्दाम थांबवले असे सावनी म्हणते.त्यावर मुक्ता सगळ्यांसमोर बोलते तुझ्या परवानगीने आदित्यला थांबवले होते. मुक्ता कधी आई होऊ शकत नाही त्यामुळे तिला आईचे दुःख काय असते हे कधीच समजणार नाही असे सावनी सांगते. तेवढ्यात सागर तेथे येतो आणि सावनीला चांगलेच सुनावतो.
वाचा: आपण फक्त श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या; पुण्यातील कार अपघातावर मराठी दिग्दर्शकाचा संताप

मुक्ताला आदित्य सापडला

सागर आणि लकी हे दोघे आदित्यला शोधत असतात. मुक्ता आदित्यला शोधण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर जाते. कारण वॉचमन बोलत असल्याचे तिला आठवते. ती पळत टेरेसवर जाते. तेथे आदित्य बेशुद्ध पडलेला असतो. मुक्ता सागरला फोन करुन बोलावते. सागर त्याला घेऊन घरी जातो. मुक्ता त्याच्यावर उपचार करत असते. सावनी तिला थांबवते. पण सागर उपचार करायला भाग पाडतो. नंतर आदित्य शुद्धीवर येतो आणि सावनी त्याला घरी घेऊन जाते.
वाचा: ठरलं! पहिला मराठी AI चित्रपट 'धर्मा- दि एआय स्टोरी' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Whats_app_banner