Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. मुक्ता आणि सागरला वेगळे करण्याचा सावनीचा डाव यशस्वी होत आहे. ती सतत सागरला तू मुक्तासाठी योग्य नाहीस हे सांगत असते. आता सागरलाही ते खरे वाटायला लागले आहे. त्यात सागरने मुक्ता आणि आशयवर संशय घेतल्यामुळे आणखी गोष्टी विचित्र झाल्या. त्यामुळे सागरला पश्चाताप होत आहे. तो मुक्ताला आता कायमचे सोडून जाणार आहे. पण याबाबत अद्याप कोणाला माहिती नाही. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? चला जाणून घेऊया...
प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ता सागरला जेवण भरवत असल्याने होते. सागरने जेवायला नकार दिला असतो. त्यामुळे मुक्ता त्याला जबरदस्ती जेवायला घेऊन जाते. ती सागरला जेवण भरवत असते. तेवढ्यात सागरला फोन येतो. तो फोनवर परदेशात बिझनेससाठी जाण्याचे बोलत असतो. फोन ठेवल्यानंतर सागर घरातील सर्वांना सांगतो. ते ऐकून सर्वांना आनंद होतो. पण मुक्ताला सागर लांब जात असल्याची जाणीव होते. ती सागरकडून प्रत्येक शनिवार आणि रविवार घरी यायचे असे वचन घेते.
सागर कायमचा दुबईमध्ये स्थायिक होत असल्याचे सावनीची मैत्रिण फोन करुन सांगते. ते ऐकून सावनीला प्रचंड आनंद होतो. सागर आणि मुक्ताला वेगळे करण्याचे सावनीचे स्वप्न पूर्ण होणार असते. त्यामुळे ती खूप खूश होते. ती मुद्दाम रात्री पाणी आणण्याच्या बहान्याने इंद्राशी बोलायला जाते. इंद्रा आई एकवीरेकडे सागरच्या सुखाविषयी बोलत असते. तेवढ्यात सावनी जाते आणि इंद्राला विचारते सागर व मुक्ताचे भांडण झाले आहे म्हणून तर सागर कायम परदेशात चालला नाही ना. त्यावर इंद्रा सावनीला चांगलेच ऐकवते.
वाचा: बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी अभिनेत्रीने असे काही केले की पोलिसांनी केली अटक, वाचा काय झालं नेमकं?
सागरला सिंगापूरला जाण्याआधी आशयला फोन करुन त्याची माफी मागतो. त्याला मुक्ताची काळजी घेण्यास सांगतो. त्यानंतर तो वकीलांना देखील बोलवून घेतो. सागर वकिलांना सांगून सर्व संपत्ती मुक्ताच्या नावावर करतो. तसेच तो सिंगापूरला गेल्यावर सर्व कागदपत्र मुक्ताला पोच करा असे देखील म्हणतो. आता मालिकेच्या आगामी भागात होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.