'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागर कोळी हा एक जबाबदार वडील आणि उत्तम पती होण्याची भूमिका साकारत आहे. पण सागरचा मुलगा आदित्यने मुक्ताची आई माधवी गोखलेचा अपघात केल्यानंतर मालिकेतील चित्र पूर्णपणे बदलले आहे. मुलाला वाचवत असताना नवरा म्हणून मुक्ताशी सतत खोटे बोलण्याचा सागरला त्रास होत आहे. आता मालिकेत आजच्या भागत काय होणार? हे जाणून घेऊया...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही स्वाती आणि कार्तिकच्या मुलीच्या बारशाने सुरु होते. सगळेजण बारश्याचा आनंद घेत असतात. पण कार्तिक आणि सावनी येऊन त्यांच्या आनंदावर विरझण घालताना दिसतात. सागर सावनीवर चिडतो तू आदित्यला इथे का घेऊन आलीस त्याने माधवीला पाहिले तर तो घाबरेल असे तो बोलत असतो. तेवढ्यात मुक्ता तेथे येते आणि संपूर्ण विषय बदलतो. मुक्ताला काही तरी चुकीचे होत असल्याची चाहूल लागते.
वाचा: 'इसको बोलते है....', बिग बॉस मराठीमध्ये महेश मांजरेकरांची जागा रितेशने घेताच शेवंताने केली कमेंट
पुरुशोत्तम माधवीच्या मागे लागून तिला तयार करुन मुक्ताचा घरी बारश्याला घेऊन जाते. तेथे कार्तिकला पाहून माधवीला त्रास होतो. ती तेथे जराही न थांबता निघून जाते. माधवीची झालेली अवस्था पाहून पुरु तिला मोकळ्या हवेत घेऊन जातो. तिला बिल्डींग खाली फेरफटका मारण्यास नेतो. तेवढ्यात अपघात घडवून आणलेली सावनीची गाडी माधवी पाहाते. ती पुरुला सांगते की याच गाडीने माझा अपघात झाला. ते दोघेही पळत पळत मुक्ताच्या घरी जातात. मुक्ताला घडलेला प्रकार सांगतात. सगळे कोळी कुटुंबीय ती गाडी कोणाची होती हे तपासण्याचा प्रयत्न करतात. पण याचा काही उपयोग होत नाही.
वाचा: नेहमी तर आईसोबत दिसते, मग शाळेत कधी जाते?; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे उत्तर
माधवीला ती गाडी कोणाची आहे हे जाणून घ्यायचे असते. पण ती सोसायटीचे सीसीटीव्ही फूटज नसल्यामुळे तसेच वॉचमेन जेवायला गेल्यामुळे ती गाडी कुणाची होती कळायला मार्ग नसतो. पण हे सगळं पाहून आदित्य घाबरतो आणि घर सोडून पळून जातो. आता आदित्य कुठे गेला असा प्रश्न सर्वांना पडतो. सगळेजण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. सावनी रागारागात कोळी कुटुंबीयांच्या घरी येते. ती मुक्ताला तुझ्या पोटचं पोर हरवलं असतं तर तुला कळालं असतं असे बोलताना दिसते. आता मालिकेच्या आगामी भागात आदित्यचा शोध लागणार का? त्याचे सत्य सर्वांसमोर येणार का? या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर
संबंधित बातम्या