Premachi Goshta: सागर मुक्ताला सोडून कायमचा जाणार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रंजक वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: सागर मुक्ताला सोडून कायमचा जाणार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रंजक वळण

Premachi Goshta: सागर मुक्ताला सोडून कायमचा जाणार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रंजक वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 21, 2024 01:41 PM IST

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आता सागर मुक्ताला कायमचा सोडून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

premachi goshta
premachi goshta

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. मुक्ता आणि सागरला वेगळे करण्याचा सावनीचा डाव यशस्वी होत आहे. ती सतत सागरला तू मुक्तासाठी योग्य नाहीस हे सांगत असते. आता सागरलाही ते खरे वाटायला लागले आहे. त्यामुळे सागर आता सावनीच्या सांगण्यावरुन मुक्ताला घटस्फोट देणार का हे मालिकेच्या आगामी भागात पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहे.

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ता आणि आशयपासून होते. आशय मुक्ताला समजावण्यासाठी तिच्या क्लिनिकमध्ये जातो. तो मुक्ताला सांगत असतो की सागर हा तिच्यासाठी फार चांगला माणूस नाही. त्याला जराही कदर नाही. पण मुक्ता या सगळ्यामध्ये आशयला समजावण्याचा प्रयत्न करते ही सागर हाच तिच्यासाठी योग्य आहे. कितीही काही झाले तरी सागर शिवाय ती कोणाचा विचार नाही करु शकत असते मुक्ता सांगते. आशय आणि मुक्ताचे बोलणे सागर ऐकत असतो. त्याला बोलणे ऐकून पश्चाताप होतो.

सावनी पुन्हा दिला सागरला सल्ला

आशय आणि मुक्ताचे बोलणे ऐकून सागर घरी जातो. त्याला प्रचंड वाईट वाटत असते. आपण मुक्ताला खूप त्रास दिला आहे असे सागरला वाटत असते. मुक्ताचे मन किती साफ आणि ती त्याच्याशिवाय कुणाचाही विचार करत नाही याची सागरला जाणीव होते. हतबल झालेल्या सागरला पाहून सावनी संधी साधते. ती सागरला तू मुक्तासाठी योग्य नाहीस असे बोलते. मुक्ताला तुझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल असे ती सांगते. त्यामुळे आता सागर काय करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

कुटुंबीयांने केले मुक्ताचे कौतुक

मुक्ता ही घरात सगळ्यांची काळजी घेत असते. ती सईचा योग्य प्रकारे अभ्यास घेते. लकीला वेळेत औषधे देते. इंद्राला काय हवं काय नको याचा विचार करते. स्वातीच्या मुलीची आणि स्वातीची दोघींचीही ती योग्य प्रकारे काळजी घेते. ते पाहून सागरला आणखी वाईट वाटते. मुक्ता सर्व काही करत आहेत आणि आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही असे त्याला वाटते.
वाचा: प्रसिद्ध अभिनेत्रीचा खासगी MMS लीक, १७ सेकंदांच्या व्हिडीओने माजली खळबळ

सागर कायमचा निघून जाणार सिंगापूरला

मुक्ताला आपल्यापेक्षा कोणीतरी चांगला व्यक्ती मिळू शकते हे सावनीने सावनीने सागरच्या डोक्यात घातले आहे. त्यामुळे तो शेवटी मुक्ताला सोडून जाण्याचा निर्णय घेतो. सागर सर्वांना सोडून बिझनेससाठी सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतो. त्यापूर्वी तो आशयला फोन करुन मुक्ताची काळजी घेण्यास सांगतो.

Whats_app_banner