'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागर कोळी गेल्या काही दिवसांपासून मुक्ता आणि गोखले कुटुंबीयांपासून सतत काही गोष्टी लपवताना दिसत आहे. सागरसाठी हे सगळं कठीण झाले आहे पण मुलाच्या प्रेमापोटी त्याला करावे लागत आहे. पण आता आदित्यचे सत्य सर्वांसमोर आले आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेऊया...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत स्वातीच्या मुलीच्या बारश्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्ता, लकी, सागर, सई सर्वचजण बारश्याची तयारी करतात. सकाळी उठल्यापासून सर्वजण तयारीला लागतात. मुक्ता पाळणा सजवते, नैवेद्यासाठी शिरा बनवते. हे पाहून सर्वजण आनंदी होतात. एकदम उत्साहाचे वातावरण असते. तेवढ्यात कार्तिक तेथे येतो आणि सर्वांचा हिरमोड होतो. तो मुलीच्या बारश्याच्या पूजेला बसतो.
वाचा: आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले
स्वातीच्या मुलीच्या बारश्याची धूम सुरु असताना मुलीला पाळण्यात घालण्यासाठी कार्तिकच्या घरातले कुणीच नसते. त्यामुळे स्वाती थोडी शांत होते. तेवढ्यात कार्तिक म्हणतो माझ्या घरातले नाहीत असे अजिबात नाही. थांबा ते येत आहेत. तेवढ्यात सावनी आदित्यला घेऊन तेथे येते. त्या दोघांना तेथे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. कार्तिक आणि सावनीला बाहेर काढण्यासाठी सागर पुढे येतो. तेवढ्यात मुक्ता त्याला थांबवते. सगळ्यांसमोर नवे वाद नको म्हणून सगळे दुर्लक्ष करतात. सावनी स्वातीच्या बाळाचे नाव ठेवणार असते. पण शेवटी सईच तिचे नाव जुई असे ठेवते. ते पाहून सर्वांनाच आनंद होतो. स्वातीच्या मुलीचे नाव सईने ठेवले यातच सर्वांना आनंद आहे.
वाचा: मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय
सागरला प्रचंड राग आलेला असतो. तो सावनीला घराबाहेर बोलवते आणि तिच्याशी बोलत असतो. त्यावेळी तो बोलतो जर आदित्यने माधवीला पाहिले तर घाबरेल. त्याला संपूर्ण अपघात आठवेल. तेवढ्यात मुक्ता तेथे येते. ती सगळं काही ऐकते. कार्तिक तेथून निधून जात असतो तेवढ्यात माधवी ती गाडी पाहाते. त्यांना अपघात याच गाडीने घडवून आणला हे लक्षात येते. आता मालिकेत आगामी भागात काय होणार हे येत्या काळात कळणार आहे.
वाचा: कार्तिकला बारशाचे आमंत्रण देऊन इंद्राने केला घोळ, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पहिल्यांदाच मुक्ताने सुनावले सावनीला
संबंधित बातम्या