मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कार्तिकला बारशाचे आमंत्रण देऊन इंद्राने केला घोळ, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पहिल्यांदाच मुक्ताने सुनावले सावनीला

कार्तिकला बारशाचे आमंत्रण देऊन इंद्राने केला घोळ, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पहिल्यांदाच मुक्ताने सुनावले सावनीला

Aarti Vilas Borade HT Marathi
May 20, 2024 02:11 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. पहिल्यांदाच मुक्ताने सईवरुन सावनीला चांगलेच सुनावले आहे.

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ताने सावनीला चांगलेच सुनावले
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ताने सावनीला चांगलेच सुनावले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागर कोहळी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याच्या मुलगा आदित्यने माधवी गोखलेचा अपघात केल्यापासून सतत मनात गिल्ट येतो. सत्य ही सांगू शकत नाही आणि मुलाला संकटातही टाकू शकत नाही. सागर सतत मुक्ता आणि माधवीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याची हिंमत होत नाही. आता मालिकेत आजच्या भागात काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

कोळी कुटुंबीय करतायेत बारशाची तयारी

स्वातीच्या मुलीच्या बारशाची तयारी संपूर्ण कोळी कुटुंबीय करताना दिसते. मुक्ता, लकी, सई, इंद्रा, स्वाती हे सगळे बसून बारशाचे प्लानिंग करताना दिसत आहेत. स्वाती देखील आनंदी होते. पण स्वाती थोडी भावनिक होताना दिसते. कारण तिच्या सासरकडे कोणीही येणार नसतात आणि आता तर तिचा नवरा देखील तेथे नसतो. त्यामुळे स्वातीला रडू कोसळते. पण बापू तिला धीर देताना दिसतात.
वाचा: उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

इंद्रा बोलावणार कार्तिकला

स्वाती खोलीमध्ये जाऊन रडत असते. तेवढ्यात इंद्रा तेथे येते आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करते. पण स्वाती काहीही ऐकायला तयार नसते. स्वातीला धीर देत आपल्या हातात काहीच नाही असे इंद्रा सांगते. तुझे बापू आणि भाई दोघेही त्या मुक्ताच्या तालावर नाचतात असे ती म्हणते. शेवटी स्वातीच्या मोबाईलवरुन इंद्रा फोन करते आणि कार्तिकला बारशाचे आमंत्रण देते. सुरुवातीला कार्तिक येण्यास नकार देतो. पण शेवटी येण्यास तयार होतो.
वाचा: अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

मुक्ता सईवरुन सावनीला सुनावते

मुक्ता आणि सई शाळेत गेलेले असतात. तेवढ्यात समोर आदित्य आणि सावनी येतात. आदित्यला पाहून सई त्याला स्वातीच्या बाळाच्या बारशाचा आमंत्रण देते. आदित्य लगेचच सावनीला म्हणतो की बारशाला जायचे तर आपल्याला गिफ्ट घ्यावे लागणार. पण, सई त्याला तू गिफ्ट नाही आणले तरी चालेल असे सांगते. त्यानंतर सई आणि आदित्य बाजूला जाऊन गप्पा मारायला लागतात. तर, इकडे सावनी मुक्ताला चांगलीच डिवचते. सावनी आदित्य आणि सई ही माझी मुले असल्याचे मुक्ताला सांगते. त्यावर मुक्ता थेट सई ही माझी मुलगी आहे. नशिबाने आम्हाला एकत्र आणले आहे. तू आमचं नशीब आणि नातं हिरावून घेऊ शकत नाही असे बजाऊन सांगते.
वाचा: मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

टी-२० वर्ल्डकप २०२४