मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वटपौर्णिमेच्या दिवशी सावनी घेणार मुक्ताचा बदला, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

वटपौर्णिमेच्या दिवशी सावनी घेणार मुक्ताचा बदला, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 20, 2024 12:56 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मुक्ताने सावनीसाठी कितीही चांगले केले तरी ती काही सुधारण्याचे नाव घेत नाही. ती सतत मुक्ताला कमीपणा यावा यासाठी डाव आखताना दिसते.

Premachi Goshta
Premachi Goshta

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी सतत काही ना काही डाव आखत असते. तसेच मुक्ता तिच्या चांगूलपणामुळे नेहमीच त्या डावांमध्ये अडकताना दिसते. पण सागर कायमच मुक्ताच्या पाठीशी उभा असल्याचे पाहायला मिळते. आता 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात नेमकं काय होणार? हे जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

मुक्ताने सर्वांसमोर केले सागरला किस

मिहिर सागरला पहिल्या किसचे महत्त्व सांगतो. त्यानंतर सागर वेळ न वाया घालवता मुक्ताला किस करतो. पण मुक्ताला किस केल्यानंतर तो तिच्याकडे ते पुन्हा देखील मागतो. आता मुक्ता किस परत कसं करणार हा विचार करत असते. तेवढ्यात ती इंद्राचे मिहिकाला सून म्हणून स्वीकारल्याने आभार मानते आणि गालावर किस करते. नंतर ती स्वाती, सईला देखील किस करत थँक्यू म्हणते. तेथे सागर देखील असतो. मुक्ता त्याच्या जवळ जाते आणि सगळ्यांसमोर गालावर किस करते. ते पाहून सागरला धक्का बसतो. तो मुक्ता असं सगळ्यांसमोर किस करेल असे त्याला वाटलच नव्हतं.
वाचा: 'सोनाक्षी आणि जहीरची मुले होऊ द्या', स्वरा भास्करने दोघांच्या धर्मावरुन मांडले स्पष्ट मत

हर्षवर्धनचा डाव मुक्ताला कळाला

मुक्ता सागरला किस करुन पळत गोखलेंच्या घरी जात असते. तेवढ्यात तिला हर्षवर्धन तेथे आलेला दिसतो. मुक्ता आणि हर्षवर्धनची ठोकर होते. त्यामुळे हर्षवर्धनच्या हातातील पेपर खाली पडतात. त्याने तयार केलेले हे पेपर मुक्ता पाहाते. ते पाहून मुक्ताला भीती वाटते की जर सावनीने या पेपरवर सही केली तर हर्षवर्धन तिला कधीही आयुष्यातून काढून टाकेल. शेवटी मुक्ता पुन्हा सावनीच्या मदतीला जाते. हर्षवर्धन ते प्रॉपर्टीचे पेपर असल्याचे सांगून सावनीची सही घेणार असतो. तिने सही करण्यापूर्वी मुक्ताच्या हातून त्यावर कॉफी सांडते. सावनी चिडते पण हर्षवर्धन काही न बोलता निघून जातो.
वाचा: शुटिंगदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शकाला दादा कोंडकेंनी खायला घातली होती बटाट्याची भाजी, वाचा किस्सा

सावनीने आखला नवा डाव

मुक्ताची पहिलीच वटपौर्णिमा असते. त्यामुळे ती तयारी करत असते. सावनी मुक्ताच्या ताटातील धागा तोडते आणि पुन्हा गुंडाळून ठेवते. मुक्ता वडाला फेऱ्या मारत असताना तो धागा तुटतो. धागा तुटणे हे अशूभ असते. ते पाहून इंद्रा चिडेल असे सावनीला वाटत असते. पण धागा तुटताच सागर तेथे येतो आणि तो हातात पकडतो. सावनीचा डाव असफल होतो.
वाचा: दाक्षिणात्य हॉरर सिनेमा 'नमस्ते घोस्ट' घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर पाहाता येणार

WhatsApp channel