छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'प्रेमाची गोष्ट.' सध्या मालिकेत लकीचे प्रकरण समोर आले आहे. मुक्ताच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या आरतीच्या पोटात लकीचे बाळ असते. पण लकी त्या बाळाला नाव देण्यास नकार देतो. आता मुक्ता आरतीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. सागर आणि कोळी कुटुंबीय मुक्ताला विरोध करत असतात. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ताने सर्वकाही ठीक व्हावे यासाठी उपवास केलेला असतो. पण यामुळे मुक्ता आजारी पडते. आशूला मुक्ताच्या उपवासाबाबत माहिती असते. जेव्हा मुक्ताला चक्कर येते तेव्हा डॉक्टरांना बोलावण्यात येते. डॉक्टर मुक्ताने काही खाल्ले का विचारतात. त्यावर सागर हो तिने काही तरी खाल्ले आहे असे सांगतो. पण तेवढ्यात आशू येतो आणि सांगतो की तिने काहीही खाल्लेले नाही. ते ऐकून सागरला आणखी राग येतो.
मुक्ता लवकर बरी व्हावी म्हणून सई आणि आदित्य तिच्या भोवती बसलेले असतात. तसेच तिला कधीच त्रास देणार नाही असे देखील प्रॉमिस देतात. त्यानंतर दोघेही मुक्ताला जेवण भरवतात. त्यानंतर फिरायला जायचा प्लान करतात. तेव्हा आशू सई आणि आदित्यला शुक्रवारी शाळेची दांडी मारायला सांगतो. म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार सुट्टी घेता येईल असे सांगतो. ते ऐकून मुक्ता म्हणते असे सल्ले जर आशू काका देणार असेल तर लांब ठेवावे लागणार त्याला.
सई, आदित्य, मुक्ता आणि आशू एकत्र गप्पा मारत असताना सागर खोलीच्या बाहेर उभं राहून सर्व पाहात असतो. तेवढ्यात सावनी येते. सावनी म्हणते सागर प्रत्येकाचे दिवस बदलतात. आशूसोबत मुक्ता खूप खूश दिसते. तसेच त्याला मुक्ताबद्दल बरेच माहिती आहे. असे म्हणत ती सागरचे कान भरत असते. सागर लगेच सावनीला ऐकवतो. माझा मुक्तावर पूर्ण विश्वास आहे. त्या असे काही करणार नाहीत. तो सावनीला चांगलेच ऐकवतो.
वाचा: पतीच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या नीना कुलकर्णी, आज दोन्ही मुले आहेत करिअरमध्ये यशस्वी
सावनी ही आरतीचे देखील कान भरते. तिला पोलिसात तक्रार करायला भाग पाडते. इकडे सागर लकीच्या लग्नाचा विचार करत असतो. लकीला हे लग्न करायचे नसते तरीही त्याला तो हे करावे लागेल असे म्हणत असतो. तेवढ्यात त्यांच्या घरी आरतीने केलेल्या तक्रारीची नोटिस येते. आता मालिकेत पुढे काय होणार? हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.