मुक्ता सर्वांसमोर करणार सागरला किस, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील रोमँटिक सीनची जोरदार चर्चा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुक्ता सर्वांसमोर करणार सागरला किस, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील रोमँटिक सीनची जोरदार चर्चा

मुक्ता सर्वांसमोर करणार सागरला किस, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील रोमँटिक सीनची जोरदार चर्चा

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jun 19, 2024 01:29 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आता रोमँटिक ट्रॅक पाहायला मिळणार आहे. सागर आणि मुक्तामध्ये प्रेम खुलणार आहे. मालिकेचा प्रोमो देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे.

premachi goshta: 'प्रेमाची गोष्ट' रोमँटिक सीन
premachi goshta: 'प्रेमाची गोष्ट' रोमँटिक सीन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे दिसत आहे. सागरने प्रेमाची कबुली दिली असून आता तो मुक्ताच्या जवळ येताना दिसत आहे. मुक्ता देखील या सगळ्यात कमी नाही. ती देखील सागरने तिला दिलेले चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सर्वांसमोर किस करणार आहे. चला पाहूया आजच्या भागात काय घडणार आहे?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मिहिर आणि मिहिकाच्या फोनने होते. मिहिका सध्या कामानिमित्त बाहेर गेली आहे. त्यामुळे ते दोघे सतत फोनवर बोलताना दिसतात. मिहिर मिहिकाशी रोमँटिक अंदाजात फोनवर बोलत असतो. तो मिहिकाकडे किस मागत असतो. तेवढ्यात सागर तेथे येतो. मिहिर सागरला पहिल्या किसचे महत्त्व सांगतो. तेव्हा सागरच्या डोक्यात मुक्ताचा विचार येतो. आपण पुढाकार घ्यायला हवा आणि मुक्ताला आणखी वाट पाहायला लावायची नाही असे तो ठरवतो. त्यानंतर तातडीने घरी जातो.
वाचा: 'कथेमध्ये आम्ही थोडा बदल करायचो', शाहरुख खान लेक अबरामला सांगायचा महाभारतातील कथा

सागरची झाली फजिती

सागर दुपारीच ऑफिसमधून घरी येतो. तो खोलीमध्ये जातो तेव्हा मुक्ता बेडवर झोपली आहे असे त्याला वाटते. मुक्ता यावेळी घरी कशी असा विचार त्याच्या मनात येतो. तो पांघरुणाच्या आतमध्ये कोण झोपले आहे याचा विचार न करताच मनातील भावना बोलण्यास सुरुवात करतो. तो पहिले किस आणि नात्याविषयी बोलायला लागतो. तेवढ्यात बेडवर झोपलेला लकी तोंडावरुन पांघरुण काढतो. ते पाहून सागर दचकतो. तितक्यात मुक्ता तेथे येते. लकी मुक्ताला म्हणतो की, वहिनी तू दादूसला विचार की तो यावेळी कशाला, कोणत्या कामासाठी घरी आलाय. लकीच्या रुमची साफसफाई सुरू असल्याने तो सागरच्या बेडरुममध्ये झोपलेला असतो.
वाचा: ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात, जुई गडकरीने पोस्ट करत केले आवाहन

सागरने केलं मुक्ताला किस

लकी खोलीतून गेल्यावर मुक्ता आणि सागर दोघेही एकटे घरात होते. मुक्ताचा स्कार्फ हा तिच्या कानातल्यामध्ये अडकला आहे. सागर तिला तो काढण्यास मदत करतो. पण त्यावर मुक्ता म्हणते, 'का? आजची स्त्री आहे मी, सेल्फ मेड आणि स्वावलंबी. सागर त्यावर म्हणतो की मी जे करणार ते तुम्ही कराल का? असे म्हणत सागर मुक्ताच्या गालावर किस घेतो. सागरची ही कृती मुक्तासाठी सुखद धक्का असतो. सागरच्या या कृतीवर मुक्ता प्रेमाने भावूक होते. आता तुम्हीदेखील मी जे केलं आहे, ते तुम्हीदेखील करा असे सागर मुक्ताला सांगतो. त्यानंतर मुक्ता एकदा सर्वजण हॉलमध्ये उभे असताना मुक्ता सागरला किस करते. ते पाहून सागर लाजतो. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: कसला बॉम्ब पडलाय यार; आई-बाबा होणाऱ्या निपूण-वैदेहीची गोष्ट! 'एक दोन तीन चार'चा टीझर प्रदर्शित

Whats_app_banner