छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'प्रेमाची गोष्ट'मध्ये मुक्ता हे महत्त्वाचे पात्र आहे. मुक्ताच्या आयुष्याभोवती मालिकेची कथा फिरताना दिसत आहे. मुक्ताचा चांगूलपणा जर प्रेक्षकांना खटकत असला तरी मालिकेतील कथानक प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे. आता मालिकेत थोडे वेगळे वळण आले आहे. मुक्ताने हर्षवर्धनच्या कानशिलात लगावली आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ता इंद्रा आणि लकीसाठी नाश्ता तयार करण्यापासून होते. मुक्ता इंद्राला चहा आणि लकीला कॉफी देते. पहिल्यांदाच इंद्राला मुक्ताचा हातची कॉफी आवडली आहे. ती मुक्ताचे कौतुक करते. तसेच लकीला देखील कॉफी आवडते. मुक्ताचे सकाळीच दोघे कौतुक करतात. त्यानंतर मुक्ता सईच्या शाळेची तयारी करते. सागर सईला सोडला जातो.
मुक्ता सागरसाठी कॉफी ठेवते. तेवढ्यात मिहिर तेथे येतो आणि त्याला कॉफीचा चांगला वास येतो. तो मुक्ताकडे कॉफी मागतो. तोपर्यंत सागरची कॉफी थंड होते. सागर कॉफी गरम करण्यासाठी जातो तोपर्यंत दूध संपलेले असते. सागर ते पाहातो आणि मुक्ताला त्याच्याकडेची कॉफी ऑफर करतो. मुक्ता थोडी लाजते. तेवढ्यात सागर तिला सांगतो की आपलं लग्न झालय आता जे काही आहे ते आपल्या दोघांचे आहे. ते दोघे कॉफी शेअर करतात.
मिहिका हर्षवर्धनच्या घरी गेलेली असते. तेथे सावनीसाठी आणलेली ज्वेलरी ती पाहाते. तिला त्यामधला एक हार आवडतो. पण तो सर्वात जास्त महाग असतो. तसेच तो सावनीसाठी आहे हे तिला माहिते असते. पण हर्षवर्धन तिला तो गिफ्ट म्हणून देतो. मिहिका आधी नाही म्हणते पण नंतर तोच हार घेते. चुकून बोलता बोलता ती मुक्ताला सांगते.
वाचा: अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? स्पेनमधील मिस्ट्री मॅनचा फोटो व्हायरल
हर्षवर्धनला मिहिकासोबत लगट करायची असते. पण मिहिका त्याला जिजू बोलताना दिसते. मुक्ताला हर्षवर्धनचा प्लान कळू लागतो. ती सतत मिहिकाला हर्षवर्धनपासून लांब राहण्याचा सल्ला देत असते. पण मिहिका काही ऐकत नाही. आता हर्षवर्धनने मिहिकाच्या ज्यूसमध्ये ड्रींक मिसळले आहे. ते चुकून तिच्या अंगावर सांडते. मिहिता कपडे बदलून येते. त्यानंतर हर्षवर्धनला चक्कर येते. ती त्याला घेऊन खोलीत जात असते. तेव्हा हर्षवर्धन मिहिकाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो. ते पाहून मुक्ता त्याच्या कानशिलात लगावते.
संबंधित बातम्या