'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तिचा स्वभाव, तिचे वागणे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेत मुक्ता ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली आहे. मुक्ता एक डेंटिस्ट आहे. तिने सईसाठी सागर कोळीशी लग्न केले आहे. पण आता सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण झाली आहे. पण सागरची पूर्वपत्नी सावनी ही सतत त्यांच्या संसारात डोके घालत असते. अशातच आता मालिकेत मुक्ताच्या मित्राची एण्ट्री झाली आहे. त्याच्या येण्याने सर्व काही बदलले आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या एक वेगळे वळण आले आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून मुक्ता ही तिच्या परदेशात असणाऱ्या मित्राविषयी बोलताना दिसत आहे. ती सतत आशू आशू असे म्हणत असते. आता अखेर आशू मुंबईत आला आहे आणि मुक्ताला भेटण्यासाठी घरी आला आहे. आशूने कोळी कुटुंबीयांसाठी गिफ्ट्स आणले आहेत. ते पाहून सर्वांना आनंद होतो. पण आशूच्या येण्याने सागर मात्र आनंदी नाही. सागरला प्रचंड राग आला आहे. घरातील सर्वजण आशूच्या मागे-पुढे करत असल्याचे कळताच सागरला राग येतो.
लकी हा आरतीवर प्रेम असल्याचे नाटक करतो. तो आरतीला सतत गोड बोलून प्रेमाच्या जाळत अडकवतो. तिच्याशी शारिरीक संबंध ठेवतो. या सगळ्यामध्ये आरती ही गरोदर आहे. आता आरती सतत लकीला आपण लग्न करुया असे म्हणत असते. पण लकीला आरतीसोबत लग्न करायचे नाही. त्यामुळे तो तिला भेटण्यासाठी टाळाटाळ करत असतो. शेवटी आरती लकीच्या बिल्डींग खाली जाते आणि त्याला विचारते घरी सांगणार आहेस की नाही. त्यावर लकी तिच्या हातावर पैसे टेकवतो आणि गर्भपात करण्यास सांगतो. आता मालिकेत पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा : अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक
आशू च्या येण्याने सागर थोडा डिसर्टब होतो. त्याला आशूने मिटिंग रद्द केल्याचा मनात राग असतो. त्यामुळे तो आशूशी देखील नीट वागत नाही आणि मुक्ता शी देखील. पण तरीही मुक्ता त्याला सांभाळून घेते. आता मालिके त पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.