स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न संपायचे नाव घेत नाहीये. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु असताना रोज काही तरी नवे ड्रामे होत आहेत. आता आदित्यने मुक्ताविरोधात तक्रार केल्यानंतर सागर चिडला आहे. त्याने थेट सावनीला आदित्यच्या अशा वागण्याला दोषी ठरवले आहे. तो सावनीला सांगतो की आता आदित्यची कष्टडी मी घेणार आहे. त्यामुळे मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?
हर्षवर्धन आदित्यला मुक्ताच्या विरोधात काही तरी करायला सांगतो. म्हणजे स्वत:ला त्रास होईल असे. आदित्य उकळलेले पाणी स्वत:च्या हातावर ओतून घेतो. त्यानंतर तो पोलिसात तक्रार करतो. जेव्हा पोलीस मुक्ताला अटक करण्यासाठी येतात. तेव्हा सर्वांना धक्का बसतो. हे सगळं मुक्ताने केले असे तो म्हणतो. तेवढ्याच सई सागरला बोलावून आणते. सागर आदित्यला प्रश्न विचारतो हे नेमके कसे झाले मला सांग. त्यावर आदित्य थोडा घाबरतो. सागर आदित्यला सांगतो जर खरे सांगितले नाहीस तर तुला पोलिसात देईन. तेव्हा आदित्य म्हणतो की मुक्ताने केलेले नाही. पोलीस तेथून निघून जातात.
आदित्यचा हात भाजला असल्यामुळे सावनी तातडीने हर्षवर्धनला फोन करते आणि डॉक्टरांना बोलवायला सांगते. सावनीचे बोलणे ऐकून हर्षवर्धनला आनंद होते की आदित्य त्याचे ऐकत आहे. तसेच सावनीच्या आनंदासाठी तो काहीही करायला तयार असल्याचे हर्षवर्धनला समजते. त्याच्या घरी मिहिका बसलेली असते. त्यामुळे हर्षवर्धन काहीच माहिती नसल्याचा आव आणतो.
वाचा: पावसाळ्यात कपडे वाळवणं ही सुद्धा एक कलाच! कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट व्हायरल
आदित्य सतत चुकीचे वागत असल्यामुळे सागर सावनीला त्याच्या वागण्याला दोषी मानतो. जरा तुझ्या सगळ्या गोष्टीतून वेळ काढ आणि त्याच्याकडे लक्ष दे. नाही तर तुझं तू लग्न कर आणि तुझ्या नवऱ्यासोबत सुखाने संसार कर. मला माझा मुलगा हवाय. मी माझ्या मुलाची कष्टडी घेणार असे सागर सावनीला बजावून सांगतो. ते ऐकून सावनी घाबरते. ती मुक्ताकडे विनवणी करते की एक मुल तरी माझ्याजवळ राहू दे. मी एकटी कशी जगू. आता सागर खरच आदित्यची कष्टडी घेणार का? आदित्य हर्षवर्धनचे सत्य सांगणार का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहे.
संबंधित बातम्या