मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
May 17, 2024 01:42 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत एक नवे वळण आले आहे. सावनीने सागरला मुक्तापासून लांब करण्याचा डाव आखला आहे. आता तिचा हा डाव यशस्वी होणार का? चला जाणून घेऊया…

premachi goshta: मुक्ताल करेल का सागर आणि आदित्यला माफ
premachi goshta: मुक्ताल करेल का सागर आणि आदित्यला माफ

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत माधवीचा अपघात झाल्यापासून सागर कोळीच्या आयुष्यात खूप गोष्टी बदलल्या आहेत. मुक्ता आणि आदित्य दोघांनाही सांभाळताना त्याची तारेवरची कसरत झाली आहे. माधवीचा अपघात कोणी करुन आणला हे जाणून घेतल्या शिवाय मुक्ता काय शांत बसणारी नाही. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सागर मुक्ता यांच्यामधील भांडणाने होते. सागर मुक्ताला कुठे तरी फिरायचा विचार करत असल्याचे सांगतो. त्यावर मुक्ताला असे वाटते की तो कुटुंबीयांसोबत फिरायला येणार आहे. त्यामुळे मुक्ता सगळ्यांना घेऊन फिरायला जायचे असल्यामुळे आनंदी होते. पण सागर तिला थांबवतो आणि आदित्यसोबत जाणार असल्याचे सांगतो. ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. ती सागरवर चिडते. पण काही न बोलताच तेथून निघून जाते. सागरकडे पर्याय नसतो त्यामुळे तो यावर काही बोलत नाही.
वाचा: बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई

सईने केला मुक्ताकडे हट्ट

सईला जेव्हा कळते की सागर तिच्या समर कॅम्पमध्ये येणार नसतो तेव्हा ती चिडते. ती मुक्ताचे काहीच ऐकायला तयार नसते. ती हट्ट करते की माझ्या समर कॅम्पला तुम्ही दोघांनी यायचे. मुक्ता तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण सई कोणाचेही ऐकायला तयार नसते. सावनी आणि आदित्य हे मुद्दाम करत असल्याचे सई मुक्ताला सांगते. पण इतक्या छोट्या सईला काय कळते. मुक्ता तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. पण काही कोणाचे ऐकत नाही. ती बेडवर उड्या मारुन राग व्यक्त करते.
वाचा: गौरव मोरेच्या 'मॅड' अदांवर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फिदा! पाहा रोमँटिक व्हिडीओ

मुक्ता अपघात घडवून आणणाऱ्याला शिक्षा देण्याचे ठरवते

माघवीला आता बरे वाटू लागले आहे. पण डॉक्टर तिच्या डोक्याच्या आत मार लागल्यामुळे तिला त्रास होत असल्याचे सांगतात. माधवीला चक्कर येऊन ती बेशुद्ध होते. तिची अवस्था पाहून मुक्ता आरोपीला शिक्षा देण्याचा निर्णय घेते. तेवढ्यात सागर मनातल्या मनात मला आणि आदित्यला माफ करा असे बोलताना दिसतो. आता मालिकेत पुढे काय होणार? हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
वाचा: 'हे नाटक नाही, राखीची प्रकृती अतिशय गंभीर आहे', अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

टी-२० वर्ल्डकप २०२४