'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता सावनीला मदत करायला जाते. पण हर्षवर्धन गोड बोलून सावनीला आपल्या जाळ्यात अडकवतो. त्यानंतर मुक्ता सावनीची माफी देखील मागते. पण या सगळ्याने सावनीला काही फरक पडत नाही. हर्षवर्धन आदित्यला मला बाबा बोल असे सांगतो. त्यावर आदित्य नकार देतो. चला जाणून घेऊया 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय घडणार...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ता स्वयंपाक घरात पाणी गरम करत असल्यापासून होते. ती पाणी गरम करत असताना सावनीच्या विचारात गुंतलेली असते. ते विचार डोक्यात सुरु असताना मुक्ता गरम भांडे हातानेच उचलते. त्यामुळे मुक्ताचा हाताला भाजते आणि हातातील भांडे खाली पडते. तेवढ्यात सागर येतो आणि तो मुक्ताच्या हाताला क्रिम लावते. सई देखील येते. ती देखील मुक्ताच्या एका हाताला क्रिम लावते.
वाचा: ‘शरद पवार माझे आवडते नेते, तीन मिनिटात त्यांनी माझे काम केले’, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
मिहिर गोखलेंच्या घरी जातो आणि सावनीला सुनावतो. तुला स्वत:चे भले कशात आहे हे कधी कळालेच नाही. जो सांगतोय किमान त्याचे ऐकून सोडून त्यांच्यावर चिडते असे मिहिर म्हणतो. त्यानंतर सावनी चिडते आणि मुक्ताला वाटेल तसे बोलत असते. मुक्ताबद्दल सावनी नको ते बोलत असताना माधवी हे ऐकते आणि हे गोखलेंचे घर आहे, जरा सांभाळून असे बोलते. त्यानंतर सावनी बॅग वैगरे भरते. माधवीला आनंदच होतो. तेवढ्यात मुक्ता तेथे येते आणि सर्व काही थांबवते.
वाचा: बॉक्स ऑफिसवर शर्वरी वाघची जादू, 'मुंज्या' चित्रपटाने आठ दिवसात कमावले इतके कोटी!
सावनी बॅग भरत असताना आदित्य येतो आणि आपण पुन्हा कुठे चाललो हे सांगत असतो. त्यावर सावनी आपण हॉटेलमध्ये जाऊन राहणार असल्याचे सांगते. पण आपण तर मिहिर मामाच्या घरी जाणार होतो ना, त्यानंतर इकडो आलो आणि आता पुन्हा हॉटेलमध्ये. आपल्याकडे स्वत:चे घर नाही का? असा प्रश्न आदित्य विचारतो. ते ऐकून मुक्ता आदित्यला सईसोबत खेळायला जायला सांगते. त्यानंतर ती सावनीची माफी मागते. माधवी ते पाहून चिडते. मुक्ता कसं बसं आईला समजावते. ती हे सगळं आदित्यसाठी करत असल्याचे सांगते.
वाचा: ‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल; तेजश्री प्रधानची मालिका कितीव्या स्थानावर? पाहा मराठी मालिकांचा TRP Report
मुक्ता घरी असताना अचानक दरवाज्याची बेल वाजते. ती दार उघडून बघते तर हर्षवर्धन आलेला असतो. कशाला आले आहेत असा प्रश्न मुक्ता त्याला विचारते. माझ्या बायकोला असे उत्तर ते देतात. तेवढ्यात आदित्यला तेथे पाहून ते मला बाबा म्हण असे सांगतात. त्यावर आदित्य नकार देतो. मी फक्त सागर पप्पांना पप्पा म्हणणार असे बोलतो.
संबंधित बातम्या