'प्रेमाची गोष्ट' मालिकेत माधवीचा अपघात झाल्यापासून सागर कोळीच्या आयुष्यात मोठे वादळ आले आहे. मुक्ताचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असताना सागरच्या डोक्यावर मोठे वादळ आले आहे. माधवीचा अपघात आदित्याने केल्याचे कळाले तर काय होणार? असा प्रश्न त्याला सतावत आहे. एक बाप म्हणून जबाबदारी पार पाडत असताना बायकोशी खोटे वागावे लागत असल्याचे राग सतत सागरच्या मनात येत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मिहिरला एका माधवीचा अपघात ज्या गाडीने केला त्याबाबत माहिती मिळते. मुक्ता ही माहिती तातडीने सागरला सांगते. एक गॅरेजवाला असतो. त्याच्याकडे ही गाडी रिपेअरसाठी आलेली असते. त्यामुळे मिहिर त्या गाडीविषयी माहिती गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडून घेणार असतो. पण सागरला या विषयी कळताच तो गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला पैसे देऊन तोंड बंद करण्यास सांगतो. मुक्ताला या सगळ्या गोष्टी थोड्या विचित्र वाटू लागतात. पण यावरही काही बोलत नाही.
वाचा: मराठमोळ्या सोनालीला पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर करणार होता प्रपोज पण...
सावनी आणि हर्षवर्धन सागरला उद्धवस्त करण्यासाठी नवा डाव आखत असतात. त्यामुळे सावनी पुन्हा सागरसमोर साधेपणाचा आव आणत असते. पण सागरला काहीही फरक पडत नाही. दुसरीकडे हर्षवर्धन मुक्ताचा क्लिनकमध्ये जातो. तिला सावनी आणि सागरमध्ये काही तरी सुरु असल्याचे सांगतो. त्यावर मुक्ता चांगलेच उत्तर देत त्याला धमकावते. ती सागरला फोन करुन घडलेला प्रकार सांगते.
वाचा: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
गेल्या काही दिवसांपासून सागरचे वागणे पूर्णपणे बदलले असल्याचे मुक्ताला जाणावते. पण ती यावर फार काही बोलत नाही. सईच्या शाळेत मुक्ता आणि सागर दोघांनाही बोलावले असते. मुक्ता त्यासाठी तयारी करत असते. तेवढ्यात सागरला आदित्यचा फोन येतो आणि तो त्याच्या व सावनीसोबत बाहेर फिरायला जाण्याचा हट्ट करतो. सागर मुक्ताला हे सांगतो. मुक्ताला थोडा धक्का बसतो. तिला हर्षवर्धनचे बोलणे आठवते. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितशी लग्न करण्यास दिला होता नकार, जाणून घ्या काय होते कारण?
संबंधित बातम्या