स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सतत काही ना काही घडताना दिसते. पण या सगळ्यात मुक्ता स्वत:ला कितीही त्रास झाला तरी चांगुलपणा मात्र सोडायला तयार नाही. मालिकेच्या आजच्या भागात सावनी आणि हर्षवर्धनच्या हळदी समारंभाला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यातही नवा ट्विस्ट आला आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न संपायचे नाव घेत नाहीये. त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सावनीने हळदी समारंभाची जय्यत तयारी केली आहे. तिच्या मैत्रिणी या समारंभासाठी आल्या आहेत. हर्षवर्धनने पाठवलेली उष्टी हळद इंद्रा सावनीला लावायला घेऊन येते. इंद्राचा हा बदलेला चेहरा पाहून सर्वांनाच धक्का बसतो. इंद्रा इतकं चांगलं कसं वागू लागली असा प्रश्न सर्वांना पडतो.
इंद्राने सावनीच्या हळदीमध्ये मसाला मिसळल्याचे मुक्ताला कळते. ती पळत मांडवात जाते आणि मुद्दाम इंद्राने लावायला घेतलेल्या हळदीचा बाऊलला धक्का देते. जेणे करुन ती हळद जमिनीवर पडून वाया जाईल. मुक्ताचे हे वागणे पाहून इंद्रा आणि सावनी प्रचंड चिडतात. सावनी मुक्ताला वाटेल ते ऐकवते. मुक्ता देखील गपगुमान ते ऐकून घेते.
मिहिका हर्षवर्धनला सारखा जीजू म्हणून आवाज देत असते. ती हर्षवर्धनच्या हळदी कार्यक्रमाला जाते तेव्हा तेथे कुणीही नसते. ती स्वत:चे हाताने त्याला हळद लावतो. तेवढ्यात मिहिर उष्टी हळद घ्यायला येतो. हर्षवर्धन मिहिरला विनंती करुन मिहिकाला तेथेच थांबू देण्यास सांगतो. मिहिका देखील त्याच्या जाळ्यात अडकते. आता हर्षवर्धन मिहिकासोबत नेमकं काय करणार हे येत्या भागात कळेल. दरम्यान, सावनीची उष्टी हळद खराब झाल्यामुळे मिहिका चिडते. ती फोन करुन ताई तू चुकीचे वागत आहे असे सांगते. मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी आता सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: 'लक्ष्याची खूप आठवण आली', लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटक पाहून निवेदिता सराफ झाल्या भावूक
हर्षवर्धन आदित्यला मुक्ताच्या विरोधात काही तरी करायला सांगतो. म्हणजे स्वत:ला त्रास होईल असे. आदित्य उकळलेले पाणी स्वत:च्या हातावर ओतून घेतो. त्यानंतर तो पोलिसात तक्रार करतो. जेव्हा पोलीस मुक्ताला अटक करण्यासाठी येतात. तेव्हा सर्वांना धक्का बसतो.
संबंधित बातम्या