मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सागर आणि मुक्तामध्ये वाढली जवळीक, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज हर्षवर्धन काय करणार?

सागर आणि मुक्तामध्ये वाढली जवळीक, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज हर्षवर्धन काय करणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 15, 2024 02:50 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत एक रंजक वळण आले आहे. सावनी पुन्हा हर्षवर्धन कडे गेली आहे तर इकडे मुक्ता आणि सागरमध्ये जवळीक वाढत आहे.

Premachi Goshta: स्वाती आणि कार्तिकने आखला नवा डाव, मुक्ता अडकणार त्यांच्या जाळ्यात?
Premachi Goshta: स्वाती आणि कार्तिकने आखला नवा डाव, मुक्ता अडकणार त्यांच्या जाळ्यात? (Disney + Hotstar)

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. ही तयारी सुरु असताना मुक्ताला हर्षवर्धनचा खरा प्लान कळतो. त्याला सावनीशी लग्न करायचे नसते. त्यामुळे त्याने नवा डाव आखला असतो. पण मुक्ताला हा प्लान कळतो. ती सावनीची मदत करायचा प्रयत्न करते. पण हर्षवर्धन गोड बोलून सावनीला पुन्हा फसवतो. आता आजच्या भागात काय होणार जाणून घेऊया...

आदित्य मुक्ताला सावनी समजून मारतो मिठी

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही आदित्य आणि सई एकत्र खेळत असताना होते. माधवी आणि पुरु ते बघून आनंदी होतात. त्यांना मुक्ताची आठवण येते. मुक्ताचा आई होण्याचा रिजेक्ट झालेला फॉर्म त्यांना आठवतो. पण सईला बघून दोघांनाही आनंद होतो. तेवढ्यात मुक्ता येते. आदित्य मुक्ताला सावनी समजून मिठी मारतो. मुक्ताला फार छान वाटते. पण डोळ्यावरची पट्टी काढल्यावर आदित्यला सत्य कळते. तो तेथून रागात निघून जातो.
वाचा: बॉलिवूडमधील गाजलेल्या वडिलांच्या भूमिका कोणत्या? जाणून घ्या सिनेमांविषयी

सावनीने मागितली हर्षवर्धनची माफी

एका इवेंट ऑर्गनाजयरला घरी बोलावले असल्याचे सांगून हर्षवर्धन एका मैत्रिणीला बोलावतो. तो तिच्यासोबत रोमँटिक अंदाजात असताना सावनी आणि मुक्ता तेथे पोहोचतात. पण हर्ष सावनीशी गोड बोलून बोलून तिला हे सगळे दिसते तसे नसल्याचे सांगतो. शेवटी सावनी देखील त्याच्या जाळ्यात अडकते. ती दोघांचीही माफी मागते. पण सावनी हर्षला गोड शब्दात धमकी वजा इशारा देते चुकूनही माझ्याशी पंगा घेऊ नकोस.
वाचा: फादर्स डे निमित्त 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील अक्षय म्हात्रेने वडिलांना दिला खास संदेश

ट्रेंडिंग न्यूज

मुक्ता आणि सागरमध्ये जवळीक

सागरला कामाची एक फाइल हवी असते. ती फाइल सापडत नसल्यामुळे तो कपाटातले सगळे कपडे काढून टाकतो. मुक्ताच्या सगळ्या कपड्यांमुळे ही फाईल हरवली असल्याचे सागर बोलतो. तेवढ्यात सागर रोमँटिक होतो.अशात सागरचे डोके मुक्ताच्या डोक्यावर आपटते. दोघेही हसू लागतात. लहानपणी एकदा डोकं आपलं तर शिंग येतात असे सांगतात. त्यामुळे दोनदा डोके आपटायचे असे बोलले जाते. मुक्ता देखील तसेच करते. सागरला ते पाहून आनंद होतो. आता मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: संजनाची तक्रार करून काय होणार? ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक संतापले

WhatsApp channel