स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न संपायचे नाव घेत नाहीये. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु असताना हर्षवर्धन रोज काही तरी नवा डाव आखताना दिसत आहे. तो सतत मुक्ताला त्रास देत आहे. हर्षवर्धनने आदित्यला अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की तो फक्त त्याचेच ऐकत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया...
मुक्ता सावनीला समजावत असते की हर्षवर्धनला तिच्याशी लग्न करायचे नाही. तरीही सावनी ऐकत नाही. शेवटी मुक्ताला खोटे ठरवण्यासाठी सावनी प्रॉपर्टीचे पेपर तयार करते. ज्यामध्ये लग्नानंतर हर्षवर्धनची संपत्ती ही आदित्य आणि सावनीच्या दोघांच्याही नावावर होणार असते. हे पेपर सावनी हर्षवर्धनसमोर ठेवते. जेव्हा त्याला हे कळते तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडतो. तो पेपरवर सही करते. पण हर्षवर्धनला मुक्ताचा प्रचंड राग येतो. तो बदला घेण्याचे ठरवतो.
मुक्ता सतत सावनीची मदत करायला जात असते. तसेच ती आधीच्या सगळ्या गोष्टी विसरुन हर्षवर्धनच्या घरी जाते. सागरला ते कळताच धक्का बसतो. तो चिडतो आणि मुक्ताला तू हर्षवर्धनच्या घरी का गेली असे विचारतो. मुक्ता सागरला समजावण्याचा प्रयत्न करते. पण सागर काही ऐकत नाही.
आदित्यला सावनीला सारखे आनंदी पाहायचे असते. त्यामुळे तो हर्षवर्धनशी सतत संवाद साधत असतो. हर्षवर्धनशी फोनवर बोलत असतात तो आदित्यला मुक्ता आणि सागरच्या विरोधात भडकवून देतो. तसेच मुक्ताला सावनीचा आनंद पाहावत नाही असे देखील म्हणतो. आदित्य सावनीच्या आनंदासाठी काहीही करायला तयार होतो.
वाचा: दीपिका पादूकोणला मिठी मारताच ऐश्वर्याचे डोळे का पाणावले? नेमकं काय झालय?
हर्षवर्धन आदित्यला मुक्ताच्या विरोधात काही तरी करायला सांगतो. म्हणजे स्वत:ला त्रास होईल असे. आदित्य उकळलेले पाणी स्वत:च्या हातावर ओतून घेतो. त्यानंतर तो पोलिसात तक्रार करतो. जेव्हा पोलीस मुक्ताला अटक करण्यासाठी येतात. तेव्हा सर्वांना धक्का बसतो.
संबंधित बातम्या