'प्रेमाची गोष्ट' मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. सागर आणि मुक्तामध्ये चांगली जवळीक निर्माण झाली आहे. त्यांचे नाते योग्य वळणावर आले आहेत. दरम्यान, मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. लकीने एक नवे कांड केले आहे. आता ते मुक्ताला कळाल्यावर तिची काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासारखे आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेची सुरुवात ही कोळी कुटुंबीयांपासून होते. इंद्रा, स्वाती आणि कोमल एकत्र बसून लहानपणीचे फोटो पाहात असतात. त्या लकीला चिडवतात तू लहानपणापासूनच भाईवर अवलंबून आहेस. तुला स्वत:चे असे काही नाही. हे ऐकून लकीला राग येतो. तो रागाच्या भरात बेडरुममध्ये निघून जातो. तेवढ्यात सागर तेथे येतो. मुक्ता लहानपणीचे फोटो बघत असल्याचे पाहातच तो चिडतो. संपूर्ण अल्बम घेऊन तो तिथून निघून जातो.
आरतीचा प्रेग्नंसी रिपोर्ट समोर आला आहे. ती सतत लकीला फोन करत असते. पण लकीचा फोन लागत नाही. त्यामुळे आरती थेट कोळींच्या घरी येते. तिला दारात पाहून मुक्ताला आनंद होतो. ती आरतीला घरात घेऊन येते. तेवढ्यात लकी तेथे पोहोचतो. लकी नव्या गाडीचे निमित्त काढून आरतीला घराबाहेर घेऊन जातो. त्या दोघांची भांडणे होतात. आरती लकीला २४ तासांचा कालावधी देते. या वेळात तुला जो निर्णय घ्यायचा तो घे असे म्हणते.
आरतीचे प्रेग्नंसी रिपोर्ट्स घरात पडलेले असतात. सावनी ते पाहाते. तसेच ती आऱती आणि लकीचे भांडण देखील पाहाते. घाबरलेल्या लकीला सावनी चुकीचा सल्ला देते. ती लकीला हे मुल माझे नसल्याचे सांगायला लावते. आता लकी खरच तिच्या बोलण्याप्रमाणे वागणार का हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
वाचा: म्हणून मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं बंद केलं; अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं!
मुक्ताला आरतीच्या फोनमध्ये प्रेग्नंसीच्या गोळ्यांचे प्रिस्क्रीप्शन दिसते. ते पाहून ती आरतीला या मुलाचे वडील कोण आहेत? असा प्रश्न विचारते. आता आरती मुक्ताला खरे सांगणार का? असा प्रश्न पडला आहे.