Premachi Goshta: मुक्ताने उचलला सागरवर हात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: मुक्ताने उचलला सागरवर हात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Premachi Goshta: मुक्ताने उचलला सागरवर हात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 14, 2024 01:23 PM IST

Premachi Goshta Update: प्रेमाची गोष्ट मालिकेत आज सागरने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे मुक्ताने सागरवर हात उचलला आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात नेमकं काय घडणार...

premachi goshta
premachi goshta

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आशयची एण्ट्री झाल्यापासून कथानकाला एक वेगळे वळण आले आहे. मुक्ता आणि आशय हे चांगले मित्र असू शकतात यावर सागरचा विश्वास नाही. तो सतत मुक्तावर अविश्वास दाखवत आहे. या सगळ्या गोष्टींचा सावनी फायदा उचलते. ती सागरला आणखी भडकवून देते. तसेच सागर सतत सावनीच्या प्लानला बळी पडताना दिसत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

लकीचा झाला अपघात

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लकीला लग्न करायचे नसल्यामुळे तो घर सोडून निघून गेला आहे. पण वाटेत लकीचा अपघात होता. मुक्ता आणि सर्व कुटुंबीय लकीला फोन करतात. पण तो त्याचा फोन उचलत नसतो. शेवटी मुक्ताने आणखी एकदा शेवटचा फोन केला असता एका मुलाने फोन उचलला आहे. लकीचा अपघात झाला असून तो रुग्णालयात असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले आहे. मुक्ताला ते ऐकून धक्का बसतो.

सागरने दररोज दारु प्यायला केली सुरुवात

मुक्ता आणि आशय यांना मिठी मारताना पाहून सागर चिडतो. त्याच्या मनात मुक्ताविषयी अविश्वास तयार होतो. लकी हॉस्पिलमध्ये असल्यामुळे मुक्ता आशयला घेऊन जाते. कारण ती सागरशी जेव्हा बोलायला जाते तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत बेडरुममध्ये पडलेला असतो. सकाळी उठल्यावर मुक्ता कुठेच दिसत नसल्यामुळे सागर बेचैन होतो. तो मुक्ताला शोधत असताना सावनी तेथे येते आणि त्याच्या मनात आणखी संशय निर्माण करते. मुक्ता आणि सागर रात्रभर बाहेर असल्याचे सांगते. ते ऐकून सागरचे रक्त खवळते.

मुक्तावर सागरने केले अनेक आरोप

मुक्ता आशयसोबत सकाळी घरी येते. ते पाहून सागर चिडतो. तो आशयला वाटेल तसे बोलतो. तो सतत मुक्ताला तुमचा नवरा असताना तुम्हाला या तुमच्या मित्रसोबत का वेळ घालवासा वाटतो असे बोलतो. ते मुक्ता आणि आशय दोघांवर चिडतो. तेव्हा मुक्ता सरळ सांगते की तुम्ही मद्यधुंद अवस्थेत असताना मी कोणाला सांगयचे असते. ते ऐकून सागर चिडतो आणि यात माझीच चूक असल्याचे सांगून मुक्ताला आणखी हिणवतो.
वाचा: महेश मांजरेकरांची पहिली पत्नी आहे तरी कोण? दोन्ही मुलांसोबत राहते वेगळी

मुक्ताने लगावली सागरच्या कानशि‍लात

सागरच्या मनात मुक्ताविषयी विष तयार झालेले असते. त्यानंतर मुक्ता सागरशी बोलायला जाते. तेव्हाही सागर मद्यधुंद अवस्थेत असतो. तो मुक्ताला तुम्हाला इतरांना मिठी मारावीशी वाटते पण मला कधी मिठी मारली नाही असे बोलते. त्यानंतर सागर मला मिठी मारा असे बोलतो. जबरदस्ती सागर मुक्ताला मिठी मारण्याचा प्रयत्न करत असतो. मुक्ताला हे सहन होत नाही. ती सागरच्या कानशि‍लात लगावते. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

Whats_app_banner