मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: मुक्तासमोर आले सागरचे सत्य, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Premachi Goshta: मुक्तासमोर आले सागरचे सत्य, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 14, 2024 11:17 AM IST

Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. अशातच सागरचे सत्य जर मुक्ताला कळाले तर तिची प्रतिक्रिया काय असेल? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Premachi Goshta: मुक्तासमोर सागरचे सत्य आले असून आता की पुढे काय करणार?
Premachi Goshta: मुक्तासमोर सागरचे सत्य आले असून आता की पुढे काय करणार?

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत सध्या सागर कोळीवर मोठे संकट कोसळले आहे. एकीकडे त्याचा मुलगा आदित्य आहे तर दुसरीकडे त्याची पत्नी मुक्ताची आई माधवी गोखले. नेमकी कोणाची मदत करावी असा प्रश्न सागरला पडला आहे. बाप म्हणून कर्तव्य निभावताना चुकीच्या गोष्टी तर आपण करत नाही ना असा प्रश्न सागला पडला आहे. पण तो त्याच्या मनातल्या गोष्टी कोणालाही सांगू शकत नाही. आता 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सागर कोळी माधवी गोखले यांना अपघाताना नंतर कसे वाटत आहे, त्यांच्या प्रकृती चौकशी करण्यासाठी गेला आहे. दोघांमध्ये चांगले संभाषण होते. माधवी सागरचे आभार मानते. त्यानंतर सागर त्याच्या मनातील द्विधा परिस्थिती त्यांना सांगतो. माधवी त्याला कधी कधी एखाद्याचे भले होणार असेल तर बोललेले खोटे पण चांगले असते हे समजावण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर सागर तेथून निघून जातो.
वाचा: 'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

इंद्रा जाणार घर सोडून

मुक्ता सतत कोळी कुटुंबातील सदस्यांना त्रास देत असल्याचे इंद्रा सर्वांसमोर बोलते. तसेच गरम टोपाला हात लावल्यामुळे तिचा हात भाजतो. त्यानंतर इंद्रा मुक्ताला टोमणे मारते आता मला तर तुरुंगात टाकणार नाहीस ना? नाही तर खोटे आरोप करुन मला तुरुंगात टाकशील. मुक्ताला त्यांच्या वागण्याचे वाईट वाटते. पण एकही अक्षर बोलत नाही. त्यानंतर त्या स्वाती आणि कार्तिकचा विषय काढतात. त्यावर सागर त्यांची माफी मागतो माझ्या कडून चूक झाली. पण इतरांचे ऐकेल ती इंद्रा कसली. शेवटी ती जर हे जास्त झालं तर मी घर सोडून माझ्या भावाकडे निघून जाईन असे बोलते.
वाचा: विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

मुक्ताला कळाले सागरचे सत्य

सागर गेल्या काही दिवसांपासून मुक्ता पासून माधवीचा अपघात आदित्यने केला हे लपवताना दिसत आहे. पण सागरला हे कळत नाही या सगळ्या गोष्टी जर मुक्ताला सांगितल्या तर तिची प्रतिक्रिया काय असेल? ती काय आदित्यला माफ करेल ना? असा प्रश्न सागरच्या मनात येतो. त्यामुळे तो सगळे लपवताना दिसतो. याच विषयावर सागर सावनीशी बोलत असताना मुक्ता येते. तेव्हा तो फोन मिहिरचा असल्याचे खोटे बोलतो. पण सावनीचा मेसेज पाहिल्यावर मुक्ताला खात्री पटते. ती सागरला खोटं का बोलला? याचा जाब विचारते. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point