'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ताचा चांगूलपणा हा सर्वांनाच खटकताना दिसत आहे. कितीही काहीही झाले तरी सर्वांशी आनंदाने आणि चांगली वागताना दिसते. ती सध्या सागरची पहिली पत्नी सावनीला देखील सध्या मदत करताना दिसत आहे. ही गोष्ट सर्वांना खटकत असली तरी देखील मालिका प्रेक्षक आवडीने पाहाताना दिसत आहेत. आता या मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार? चला जाणून घेऊया...
मुक्ता आणि सागरला चुकीचे सिद्ध करण्यासाठी सावनी हर्षवर्धनच्या घरी अचानक जाते. पण तेथे पोहोचल्यावर बेडरुममध्ये हर्षवर्धनसोबत एक दुसरीच मुलगी असते. हर्षवर्धन तिला मिठीत घेत असतो. ते पाहून सावनी चिडते आणि हर्षवर्धनच्या कानशिलात लगावते. त्यानंतर हर्षवर्धन सावनीला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण सावनी कोणाचेही ऐकायला तयार नसते. कित्येक वेळी इच्छा नसतानाही मी तुझ्यासाठी पार्टीमध्ये आली. तू मला कधीही बायको मानले नाही. मात्र, तुला मी माझा नवरा समजले. तुझ्या सांगण्यावरून सगळ्या गोष्टी केल्या, आदित्यला हॉस्टेलला पाठवले असे म्हणत हर्षवर्धनला सुनावते. त्यानंतर हर्षवर्धनला धमकी देखील देते तुला मी चांगलेच बघून घेईन.
वाचा: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने लग्नाच्या चर्चांवर केला शिक्कामोर्तब, लग्नपत्रिका व्हायरल
घरी आलेली मुलगी ही वेडिंग प्लानर असल्याचे हर्षवर्धन सांगतो. तसेच ती आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची प्लानिंग करण्यासाठी आली असल्याचे हर्षवर्धन सांगतो. सावनीला हर्षवर्धनचे बोलणे पटते आणि ती त्याच्यावर विश्वास ठेवते. सावनीचे हर्षवर्धनवर विश्वास ठेवत असल्याचे चित्र दिसताच हर्षवर्धन निमित्त साधून मुक्ता आणि सागरवर आरोप करतो. ते ऐकून सागर प्रचंड चिडतो. मुक्ताला काहीही बोललेले खपून घेणार नाही असे तो स्पष्ट सांगतो. तसेच मला तुमच्यामध्ये जराही रस नाही. मी केवळ आदित्यसाठी आलो आहे असे सागर स्पष्ट करतो. पण कसेबसे हर्षवर्धन सावनीला गोडगोड बोलून फसवतो.
वाचा: अजिंक्य देव आणि अश्विनी भावे २५ वर्षांनंतर एकत्र, दिसणार 'या' चित्रपटात
सागर मुक्ताला घरी घेऊन जातो. तो मुक्ताला सावनीची मदत करण्याचा विषय डोक्यातून काढून टाक असे सांगतो. त्यानंतर दोघे झोपायची तयारी करत असतात. अशात सागरचे डोके मुक्ताच्या डोक्यावर आपटते. दोघेही हसू लागतात. लहानपणी एकदा डोकं आपलं तर शिंग येतात असे सांगतात. त्यामुळे दोनदा डोके आपटायचे असे बोलले जाते. मुक्ता देखील तसेच करते. सागरला ते पाहून आनंद होतो.
वाचा: काजोलला चांदेकरांनी काढले घराबाहेर, काय असेल कलाचे पाऊल? वाचा 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'मध्ये काय होणार
संबंधित बातम्या