'प्रेमाची गोष्ट' मालिकेत हर्षवर्धनने सावनीला घरातून काढून टाकल्यावर वेगळे वळण आले आहे. सावनी ही मुक्ताच्या घरी येऊन राहात आहे. ती सतत आदित्यची ढाल करताना दिसते आणि घर सोडून निघून जाण्याची धमकी देते. आता माधवीला सावनीचे सत्य कळाल्यावर काय होणार? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
मुक्ताची आई माधवी आणि पुरुषोत्तम गोखले देवदर्शनाला गेले असतात. त्यांना मिहिकाने हर्षवर्धनशी लग्न केल्याचे अद्याप कळालेले नाही. आता घरी आल्यावर माधवीला मिहिकाच्या लग्नाविषयी कळते. तेव्हा ती मुक्तावर चिडते. ती मुक्ताला मिहिकाच्या लग्नाविषयी का सांगितले नाही? याचा जाब विचारते. त्यावर मुक्ता समजावण्याचा प्रयत्न करते पण माधवी काहीही ऐकायला तयार नसते. ती प्रचंड चिडेत.
मुक्ताच्या घरात सावनीला पाहून माधवी चिडते. ही बाई इथे काय करते, हिला या घरात कोणी घेतले? असा प्रश्न ती सर्वांना विचारते. मुक्ता माधवीला घेऊन त्यांच्या घरी जाते. माधवी चिडलेली असते. ती कोणाचे काही ऐकून घेत नाही. ती सागरकडे विनंती करते ही सावनीला घराबाहेर काढा. आमच्या एका मुलीचे आयुष्य बिघडले आहे आता दुसऱ्या मुलीचा संसार मोडताना आम्हाला पाहायचे नाही असे माधवी म्हणते. कसे बसे सागर आणि मुक्ता त्यांना शांत करतात.
मिहिकाने हर्षवर्धनशी लग्न केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. पण मिहिका हा निर्णय चुकीचा नसल्याचे सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करते. माधवीला मिहिकाचा प्रचंड राग आला आहे. त्यामुळे ती तिचे तोंडही पाहात नाही. ती बोलण्याचा प्रयत्न करते पण माधवी कोणाचेही ऐकत नाही. शेवटी मिहिका नाराज होऊन निघून जाते. मुक्ता तिला पुन्हा विचारते की नेमकं काय झाले आहे? त्यावर ती पुन्हा उलट उत्तर देते. मिहिका रागात निघून जाते.
वाचा: मुलगी पलकच्या इब्राहिम अलीला डेट करण्याच्या वृत्तावर श्वेता तिवारीने अखेर सोडले मौन
सावनीला माधवीचा प्रचंड राग येतो. ती मुक्ताचा बदला कसा घ्यायचा हा विचार करत असते. तेव्हा तिला पटकन सुचते की ती एकेकाळी सागरची बायको होती. सई आणि आदित्य ही दोघांची मुले आहेत. त्यामुळे सागरच्या संपत्तीवर आजही तिचा अधिकार असल्याचे सांगते. आता यावर सागरची काय प्रतिक्रिया असणार हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.