मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
May 13, 2024 01:30 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील मुक्ताला कळाले आहे की माधवीचा अपघात कोणी केला. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार जाणून घ्या...

मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य?
मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सागर हा सतत मुक्ताचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. तो एकही गोष्ट मुक्तापासून लपू पाहात नाही. पण सध्या मालिकेत सागर कोळीची कसोटी सुरु आहे. एका बाजूला स्वत:चा मुलगा आदित्य आहे तर दुसऱ्या बाजूला बायकोची आई माधवी गोखले आहेत. आता मालिकेत आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

मुक्ताची आई माधवीचा अपघात हा कार्तिकने केला असल्याचे सागर सांगतो. मुक्ता सर्वांना सांगते की आईचा अपघात हा कार्तिकने केले आहे. माझ्यावरचा बदला घेण्यासाठी ती हे सगळं करत असल्याचे सांगते. जेव्हा मुक्ता स्वाती आणि इंद्राला हे सांगते तेव्हा त्यांना विश्वासच बसत नाही. त्या मुक्तालाच ऐकवतात. तेवढ्यात सागर देखील तेथे येतो. तो सगळं ऐकत असतो. पण काही बोलत नसतो. सर्वात शेवटी तो हे सगळं मीच मुक्ताला सांगितले आहे त्यामुळे तिला काही बोलू नका असे बोलताना दिसतो. घडलेला प्रकार स्वाती लगेचच फोन करुन कार्तिकला सांगते.
वाचा: 'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

कार्तिक सावनीवर चिडतो

हा सागर कोळी माझ्या का हात धुवून मागे लागला आहे असे प्रश्न तो सावनीला रागारागत विचारतो. पण सावनी मात्र त्याला उडवाउडवीची उत्तरे देते. या अपघाताचा माझ्याशी काहीही संबंध नसताना सागर माझ्या मागे का लागला आहे असा प्रश्न कार्तिक विचारतो. सावनी कार्तिकला चिंता करु नकोस एवढच बोलते आणि धीर देते. सावनीने नेमकं काय सत्य आहे हे देखील कार्तिकला सांगितले नाही.
वाचा: वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

हर्षवर्धन आणि सावनीचा नवा डाव

यावेळी सावनीने पोटच्या पोराला मोहरा बनवला आहे. आदित्यकडून माधवीचा अपघात होतो याचा सावनी पुरेपुर फायदा घेते. ती आणि हर्षवर्धन एक एक नवीन ड्रामा तयार करत असतात. सागर घरी आलेला पाहून हर्षवर्धन चिडतो. माझ्या गैरहजेरीत हे असच सुरु असतं का असा प्रश्न तो विचारतो. सागर गेल्यानंतर सावनी हर्षवर्धनला तिचा पूर्ण डाव सांगते. ते ऐकून हर्षवर्धून देखील खूश होतो. दुसरीकडे मुक्ताला घडलेला प्रकार कळतो. ती सागरला विचारायला जात असते. त्यामुळे सागर तिला आता तरी खरे सांगणार की सत्य लपवणार हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
वाचा: बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

IPL_Entry_Point