मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सावनीने दिली हर्षवर्धनला धमकी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय घडणार ?

सावनीने दिली हर्षवर्धनला धमकी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय घडणार ?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 13, 2024 02:08 PM IST

'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेत आजच्या भागात काय होणार जाणून घ्या...

premachi goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण
premachi goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. ही तयारी सुरु असताना मुक्ताला हर्षवर्धनचा खरा प्लान कळतो. त्याला सावनीशी लग्न करायचे नसते. त्यामुळे त्याने नवा डाव आखला आहे. आता हा डाव सावनीला देखील कळाला आहे. त्यामुळे मालिकेत आज काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

माधवीने सावनीला शिकवला धडा

पुरुला कोशिंबिर आवडते म्हणून माधवीने काकडी आणली असते. सावनी हीच काकडी घेते आणि फेकसपॅकसाठी वापरते. ते पाहून माधवी चिडते आणि सावनीला धडा शिकवते. ती मिरचीची धुरी बनवते. त्यामुळे सावनीला खोकला, शिंका येण्यास सुरुवात होते. सावनीला हे सहन होत नाही. मच्छरांच्या उपायासाठी हे केले असल्याचे माधवी सावनीला सांगते. तेवढ्यात मुक्ता घरात येते. मुक्ता सावनीची विचारपूस करत आजचा दिवस कसा गेला हे विचारते. पण, सावनी मुक्तावर चिडते आणि तू साळसुदपणाचा आव आणते. माधवीला मुक्ता बोलावून घेते आणि काय झाले हे विचारते. त्यावेळी माधवी मच्छरांना पळवण्यासाठी धूप केला असल्याचे सांगते. बोलण्याच्या ओघात मिरचीची धुरी असल्याचे ती सांगते. मुक्ताला माधवीने हे मुद्दाम केले असल्याचे कळते.
वाचा : सोनाक्षी सिन्हा करणार बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न? अभिनेत्रीने स्वत: दिली प्रतिक्रिया

मुक्ताने सागरला सांगितला हर्षवर्धनचा प्लान

मुक्ताने घडलेला प्रकार सागरला सांगितला आहे. ते ऐकून सागरला फार काही वाटत नाही. सावनीने माझ्यासोबत असेच केले होते आणि आता ते तिच्यासोबत घडत आहे असे सांगतो. पण या सगळ्याचा परिणाम आदित्यवर होणार असल्याचे मुक्ता सागरला पटवून देते. शेवटी सागर आणि मुक्ता हे सगळं सावनीला सांगण्याचे ठरवतात. तेवढ्यात दोघांमध्ये रोमँटिक क्षण निर्माण होतो.
वाचा : 'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' केतकी चितळेची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

सावनीला कळाले हर्षवर्धनचे सत्य

सागर-मुक्ता सावनीला हर्षवर्धनबाबत सत्य सांगण्यास जाते. पण, सावनी मुक्तालाच उलटं बोलते. सागर हस्तक्षेप करतो आणि मला आदित्यची काळजी वाटत असल्याचे सांगतो. त्यावर सावनी हर्षवर्धनच्या घरी जाऊयात असे सांगते आणि तिघेही घरी जातात. तेथे गेल्यावर सावनीला हर्षवर्धनचे सत्य कळते. तसेच ती त्याला धडा शिकवणार असल्याचे देखील म्हणते.
वाचा : 'मुंज्या' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! चार दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

WhatsApp channel