मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  हर्षवर्धनचे सत्य मुक्ताने आणले सावनी समोर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

हर्षवर्धनचे सत्य मुक्ताने आणले सावनी समोर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 12, 2024 02:23 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. सावनी मुक्ताच्या घरी राहायला आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेच्या आजच्या भागाची उत्सुकता लागली आहे.

Premachi Goshta: मालिकेत आज काय घडणार?
Premachi Goshta: मालिकेत आज काय घडणार?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीने पाहिलेले एक स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसत आहे. तिला कित्येक वर्षांपासून हर्षवर्धनशी लग्न करायचे होते आणि आता ते स्वप्न सत्यात उतरले आहे. ती लग्नाची तयारी करत असताना हर्षवर्धनने नवा प्लान आखला आहे. तो प्लान आता मुक्ताला कळाला आहे. त्यानंतर मुक्ता काय करणार हे जाणून घ्या...

ट्रेंडिंग न्यूज

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागची सुरुवात ही मिहिर सावनी आणि आदित्यला घरी घेऊन जाताना होते. सावनी देखील तितक्याच आवडीने आणि आनंदाने निघालेली असते. पण सावनीला हे माहिती नसते की तिला मिहिरच्या घरी नाही तर माधवी गोखले म्हणजेच मुक्ताच्या आईच्या घरी राहायला जायचे आहे. तिकडे पोहोचल्यावर तिला कळते आणि मिहिरवर चिडते. पण या सगळ्याला काही पर्याय नसल्याचे मिहिर समाजवतो.
वाचा: सोनाक्षी सिन्हा करणार बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न? अभिनेत्रीने स्वत: दिली प्रतिक्रिया

माधवी सावनीला शिकवणार धडा

सावनीला घरी राहायला देण्यासाठी आधी माधवी तयार नसते. पण हिच योग्य वेळ आहे सावनीला धडा शिकवायची हे लक्षात घेत माधवी तिला घरी राहू देते. पण घरी आल्यावर तिला माधवी घराचे काही नियम आहेत आणि ते पाळावेच लागतील असे सांगते. जर ते पाळले नाहीत घरात राहात राहायला मिळणार नाही. तसेच घरात राहणारा प्रत्येक व्यक्ती स्वत:ची कामे स्वत: करतो. त्यामुळे सावनीला आता स्वत:ची कामे स्वत: करावी लागणार आहेत.
वाचा: 'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' केतकी चितळेची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

मुक्ताला कळाला हर्षवर्धनचा प्लान

आदित्य बॅग विसरला असल्यामुळे मुक्ता ती आणण्यासाठी हर्षवर्धनच्या घरी जाते. तेव्हा तो कोणत्या तरी मुलीशी फोनवर बोलत असतो. तिला सावनीशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगतो. तसेच तिला घरी देखील बोलावतो. मुक्ता ते ऐकते. ती घरी येऊन हा सगळा प्लान सागरला सांगते. त्यानंतर मुक्ता सावनीला देखील समजावते. पण ऐकेल ती सावनी कसली. शेवटी सावनीला हर्षवर्धनच्या घरी जाण्याचा सल्ला मुक्ता देते.
वाचा: 'मुंज्या' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! चार दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

सावनी पोहोचली हर्षवर्धनच्या घरी

सावनी मुक्ताला खोटे ठरवण्यासाठी हर्षवर्धनच्या घरी जाते. तेव्हा तेथे हर्षवर्धनसोबत एक मुलगी असते. ते पाहून सावनीला राग अनावर होतो. ती हर्षवर्धनच्या कानाखाली मारते. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

WhatsApp channel