Premachi Gostha: माधवीला कळाले मिहिकाच्या लग्नाचे सत्य, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?-star pravah premachi goshta serial 12th august 2024 update ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Gostha: माधवीला कळाले मिहिकाच्या लग्नाचे सत्य, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Premachi Gostha: माधवीला कळाले मिहिकाच्या लग्नाचे सत्य, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 12, 2024 03:16 PM IST

Premachi Gostha update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत एक वेगळा ट्विस्ट आला आहे. मिहिकाने थेट हर्षवर्धनशी लग्न केले आहे. आता हे माधवीला कळावे तेव्हा ती काय आणि कशी वागणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Premachi Goshta
Premachi Goshta

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काही दिवसांपूर्वी सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न मोडले. असे ही हर्षवर्धनला सावनीशी लग्न करण्याची जराही इच्छा नव्हती. त्यामुळे तो फक्त निमित्त शोधत होता. हर्षवर्धनने मिहिकाला मोहरा बनवून लग्न मोडले. त्याने मिहिकाला लग्न करण्यास भाग पाडले. आता हे मुक्ताची आई माधवी गोखलेला कळाले आहे. त्यांनी मुक्ताला चांगलेच सुनावले आहे. मालिकेच्या आजच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

आदित्यने केली मुक्ताकडे मागणी

मुक्ता सागरवर असलेल्या प्रेमाची कबूली आज देणार होती. ती आरशामध्ये पाहून प्रॅक्टिस करत असते. तेवढ्यात आदित्य तेथे येतो आणि मुक्ताला आमच्या पप्पांना माझ्यापासून दूर करु नका असे म्हणतो. तेवढ्यात सागर तेथे येतो आणि हे शक्य नाही असे म्हणतो. त्यानंतर तो आदित्यला स्पष्ट शब्दात सांगतो की मी आणि सावनी एकत्र येणे शक्य नाही. ते ऐकून आदित्यला धक्का बसतो. तो पळत रडत सावनीकडे जातो.

मुक्ताने सावनी आणि सागरला सुनावले खडेबोल

आदित्य रडत सावनीकडे जातो. ते पाहून सावनी चिडते. तुला मुक्ता काही बोलली का? असे ती विचारत असते. सावनी पुन्हा आदित्यचे कान भरण्याचे काम करते. मुक्ताच्या पुढे सागरला काही दिसत नाही. तो सतत तिची बाजू घेणार आहे. तेवढ्यात सागर तेथे येऊन सावनीला सुनावतो. पण ऐकेल ती सावनी कसली. ती मुक्ताचे नाव पुढे करुन भांडत असते. मुक्ता तेथे येते आणि दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करते. तसेच आदित्यला सईच्या खोलीत जाण्यास सांगते. ते ऐकून सावनी अजून चिडते. ती मुक्ताला ऐकवायला जाते तेव्हा ती सांगते तुमच्या भांडणाचा मुलावर काय परिणाम होतोय हे तुम्हाला दिसत नाही का? तेव्हा कुठे जाऊन दोघेही शांत होतात. आता आदित्य पुढे काय करणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा : रणवीर सिंगनंतर अभिनेत्रीने केले अर्धनग्न अवस्थेत फोटोशूट, नेटकऱ्यांनी केली जोरदार टीका

माधवीला कळाले मिहिकाच्या लग्नाविषयी

मुक्ताची आई माधवी आणि पुरुषोत्तम गोखले देवदर्शनाला गेले असतात. त्यांना मिहिकाने हर्षवर्धनशी लग्न केल्याचे अद्याप कळालेले नाही. आता घरी आल्यावर माधवीला मिहिकाच्या लग्नाविषयी कळते. तेव्हा ती मुक्तावर चिडते. ती मुक्ताला मिहिकाच्या लग्नाविषयी का सांगितले नाही? याचा जाब विचारते. आता मुक्ता काय उत्तर देणार हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.