Premachi Goshta: लग्नापूर्वीच सावनीने तयार केले प्रॉपर्टीचे पेपर, हर्षवर्धन करणार का सही?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: लग्नापूर्वीच सावनीने तयार केले प्रॉपर्टीचे पेपर, हर्षवर्धन करणार का सही?

Premachi Goshta: लग्नापूर्वीच सावनीने तयार केले प्रॉपर्टीचे पेपर, हर्षवर्धन करणार का सही?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 11, 2024 11:17 AM IST

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ताने सावनीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता सावनीने जे पाऊल उचलले त्यावर हर्षवर्धन कसा प्रतिक्रिया देणार हे पाहण्यासारखे आहे.

Premachi Goshta
Premachi Goshta

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता ही सर्वांची लाडकी सून झाली आहे. तिचा चांगूलपणा पाहून कधीकधी प्रेक्षकांनाही राग येतो. आता मालिकेत रंजक वळण आले आहे. मुक्ताने सावनीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. सावनीला मुक्ताचे म्हणणे पटले आहे. त्यानंतर तिने उचललेले पाऊल पाहून आता हर्षवर्धन कशी प्रतिक्रिया देणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

सावनीने उचलला आदित्यवर हात

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ता, मिहिर आणि सागर यांच्या चर्चेपासून होते. आदित्यचे वागणे चुकत आहे असे माधवी देखील म्हणत असते. पण त्याला समजावण्याची गरज आहे, सावनी त्याच्यावर चांगले संस्कार करत नाही असे सर्वांचे म्हणणे असते. तेवढ्यात सावनी तेथे येते आणि सर्व काही ऐकते. तिला प्रचंड राग येतो. ती आदित्यच्या कानशि‍लात लगावते. पण आदित्य रागात निघून जातो.
वाचा: कार्टून नेटवर्क बंद होणार? सोशल मीडियावरील या ट्रेंडमागचे सत्य काय?

हर्षवर्धनचा मिहिकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न

हर्षवर्धनला सावनीशी लग्न करायचे नाही. तरी देखील तो सर्वकाही करताना दिसत आहे. पण या सगळ्यात त्याच्या लग्नाची जबाबदारी ही मिहिकाच्या कंपनीला देण्यात येते. मिहिका सतत कामानिमित्त हर्षवर्धनच्या घरी जाताना दिसते. पण हर्षवर्धनच्या मनात भलत्याच गोष्टी सुरु आहेत. त्याला मिहिका आवडू लागली आहे. तो मिहिकाशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तो मुक्तासोबत जे झाले ते व्हायला नको होते असे म्हणत मिहिकाचा हात पकडतो. मिहिकाला थोडे विचित्र वाटते. ती पटकन हात बाजूला घेते.
वाचा: फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता शिवाजी पार्कात चढला झाडावर, काय आहे प्रकरण?

मुक्ताच्या बोलण्याचा सावनीवर परिणाम

मुक्ता सतत सावनीला सांगताना दिसत आहे की हर्षवर्धनला तिच्याशी लग्न करायचे नाही. तरीही सावनी ऐकत नाही. शेवटी मुक्ताला खोटे ठरवण्यासाठी सावनी प्रॉपर्टीचे पेपर तयार करते. ज्यामध्ये लग्नानंतर हर्षवर्धनची संपत्ती ही आदित्य आणि सावनीच्या दोघांच्याही नावावर होणार असते. हे पेपर सावनी हर्षवर्धनसमोर ठेवते. जेव्हा त्याला हे कळते तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडतो. मुक्तासमोर या पेपरवर सही कर असे सावनी म्हणते. आता हर्षवर्धन पुढे काय पाऊल उचलणार? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: सत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

Whats_app_banner