'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीने पाहिलेले एक स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसत आहे. तिला कित्येक वर्षांपासून हर्षवर्धनशी लग्न करायचे असते. मात्र, हर्षवर्धन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते टाळत असतो. आता अखेर मिहिरने मागणी घातल्यानंतर हर्षवर्धन लग्नाला तयार झाला आहे. पण त्याला सावनीशी लग्न करायचे नाही. त्यामुळे त्याचा मित्र आणि तो नवा प्लान आखतो. आता हर्षवर्धन त्याच्या प्लानमध्ये यशस्वी होणार का? हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मिहिर हर्षवर्धनच्या घरी जाऊन सावनीच्या लग्नाची बोलणी करतो. हर्षवर्धन तो अतिशय खूश असल्याचे दाखवतो. तो लग्नाला होकार देतो आणि सावनीला तुझे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सांगतो. पण हे सगळं इतक्या सहज कसे झाले असा प्रश्न मात्र मुक्ताच्या मनात सतत येत असतो.
वाचा: शाहरुखचा लेक आर्यन खान ऑरीसोबत फोटो काढताना कधीच हासत नाही, काय आहे कारण?
मुक्ता घरी आल्यानंतर सागरसोबत सावनीच्या घरी काय झाले याची चर्चा करत असते. मिहिरने मागणी घालताच हर्षवर्धन तयार झाले. इतक्या सुरळीत कसे झाले सगळे असा प्रश्न मुक्ताला पडतो. सागरला देखील तिचे म्हणणे पटते. तसेच मिहिरचे कौतुक करत मुक्ता म्हणते की एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे मिहिरने परिस्थिती हाताळली आहे. मुक्ता हे सगळे सांगत असताना सागर तिच्याकडे पाहात सगळं ऐकत असतो. पुढे मुक्ता सागरला म्हणते माझ्याऐवजी तुम्ही मिहिरची समजूत काढायला हवी होती. मुक्ता सागरला कडू कारले असे बोलते. ते ऐकून सागर चिडतो. त्या दोघांमध्ये प्रेमळ भांडण होताना दिसते.
वाचा: आयपीएलच्या मैदान ते माधुरी दीक्षित; सर्वांनाच वेड लावणाऱ्या 'गुलाबी साडी' गाण्याचा ट्रेंड कुठून आला?
मिहिर घरी येऊन सावनीच्या लग्नाची बोलणी करेल असे हर्षवर्धनला स्वप्नातही वाटले नसते. त्याला कधीच सावनीशी लग्न करायचे नसते. केवळ सागरचा बदला घेण्यासाठी तो सावनीचा वापर करत असतो. पण मिहिरने लग्नाची मागणी घातल्यावर काय करणार म्हणून नाईलाजाने तो होकार देतो. हर्षवर्धनचा चेहरा पूर्ण पडलेला असतो. तेवढ्यात हर्षवर्धनचा मित्र सत्यम एक प्लान आखतो. तो सावनीला मिहिरच्या घरी राहायला जा असे सांगतो. कसं बसं सावनी या सगळ्याला तयार होते. मात्र, याच काळात हर्षवर्धन सावनीला सोडून पळून जाणार असतो.
वाचा: दिग्दर्शकाच्या प्रेमात ते वडिलांवर फसवणूकीचा आरोप; जाणून घ्या अमिषा पटेलविषयी काही खास गोष्टी
संबंधित बातम्या