'प्रेमाची गोष्ट' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाची तयारी सुरु आहे. हर्षवर्धनला जरी हे लग्न करायचे नसले तरी देखील तो सध्या सर्व तयारी करताना दिसत आहे. तो लग्नाच्या मांडवात काय घोळ घालणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया...
सावनीच्या मोबाईलवरुन चुकीचा पत्ता गेल्यामुळे मुक्ता हर्षवर्धनच्या बॅचलर पार्टीला पोहोचली हे सागरच्या लक्षात आले. या सगळ्याचा मुक्तावर मोठा परिणाम झाला आहे. मुक्ताला झोपवून सागर सावनीला जाब विचारण्यासाठी गेला आहे. हे सगळे का केले असा प्रश्न तो सावनीला प्रश्न विचारतो. तेव्हा ती सांगण्याचा प्रयत्न करते की तिने हे केलेले नाही. पण सागरला तिच्यावर विश्वास बसत नाही.
वाचा: पावसावरील 'ती' पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?
आदित्य चोरुन सावनी आणि सागरचे बोलणे ऐकतो. सावनी सागरला सांगते की तिच्या फोनचा पासवर्ड आदित्यकडे देखील आहे. त्यामुळे त्याने हा मेसेज पाठवला असेल. हे सगळं आदित्य ऐकतो आणि हर्षवर्धनला फोन करतो. तेव्हा हर्षवर्धन त्याला समजावतो आणि माझे नाव घेऊ नकोस असे बोलतो. तेवढ्यात सागर आणि सावनीला आदित्य दिसतो. ते दोघेही आदित्य हे तू केले का असा प्रश्न विचारतात. त्यावर आदित्य कबूली देतो.
वाचा: या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू
सागर आदित्यवर चिडतो. त्याने जे कृत्य केले आहे त्याचा मुक्तावर किती परिणाम झाला आहे. जर वेळेत पोहोचलो नसतो तर मुक्ताची अब्रू गेली असते असे सागर बोलत असतो. ते ऐकून आदित्य चिडतो. हे सगळं मीच केले आहे असे स्पष्ट बोलतो. सागरला राग अनावर होतो. तो आदित्यवर हात उगारतो. मुक्ता तेवढ्यात येते आणि सागरला रोखते.
वाचा: सलमान खानपासून रणवीर सिंगपर्यंत सेलिब्रिटींनीही अनंत-राधिकाच्या हळदीत केली धमाल
मुक्ता सावनीशी बोलायला जाते. ती हर्षवर्धनचा खरा चेहरा सावनीला सांगते. हर्षवर्धनला लग्न करायचे नसते. त्यासाठी तो प्रयत्न करत असतो असे मुक्ता सावनीला सांगते. पण आता सावनी मुक्तावर विश्वास ठेवणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
संबंधित बातम्या