'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता ही कोळी कुटुंबाला सांभाळताना दिसते. ती सई पासून इंद्रा पर्यंत सगळ्यांसाठी सर्वकाही करताना दिसत आहे. ती सगळ्यांची योग्य ती काळजी घेताना दिसते. आता त्यांच्या घरात सावनी आणि आदित्य राहायला आले आहेत. सावनी मुक्ताला सतत त्रास देताना दिसते. ती आदित्यच्या मनात देखील कोळी कुटुंबीयांविषयी वाईट गोष्टी भरवताना दिसते. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया...
आदित्य ज्या परिस्थितीमधून जात आहे ते पाहून मुक्ताला अतिशय वाईट वाटले आहे. मुक्ताने सागरला सर्व घडलेला प्रकार सांगितला आहे. त्यानंतर सागरला प्रश्न पडतो की आता आदित्यला कसे सांभाळायचे पालक म्हणून आपण काय करायला हवे? अशा अनेक गोष्टी सागरच्या मनात येतात. मुक्ता सागरला धीर देते. ती आपण आदित्यला विश्वास द्यायला हवा की आपण सगळी त्याची माणसे आहोत, एक कुटुंब आहोत. आपण त्याचे कधीही वाईट होऊ देणार नाही. त्यासाठी मुक्ता काही गोष्टींचे आयोजन करते. आता हे सगळं पाहिल्यावर आदित्य कसा वागणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
सकाळी उठल्यानंतर सावनी स्वातीकडे कॉफी मागते. ते पाहून इंद्रा चिडते. तुला जे हवं ते स्वत:च्या हाताने घेत जा असे इंद्रा तिला स्पष्ट सांगते. त्यानंतर त्या दोघींमध्ये चांगलेच वाजते. शेवटी सावनी तेथून निघून जाते. काही वेळानंतर सावनीचे क्रेडिट कार्ड बिल न भरल्यामुळे एक व्यक्ती बिल घेऊन घरी येतो. सावनी त्या व्यक्तीशी भांडत असे माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. मी आले की देईन. पण ती व्यक्ती कोणाचेही ऐकायला तयार नसते. शेवटी सागर तेथे येतो आणि तमाशा नको म्हणून सावनीचे बिल भरतो. त्यानंतर तो सावनीला आजपासून आदित्यचा सगळा खर्च मी उचलेन असे बोलतो. तसेच तुझ्या गरजेच्या गोष्टीही करेन. तेवढ्यात मुक्ता येते आणि तो मुक्ताला शॉपिंगसाठी क्रेडिट कार्ड देतो. ते पाहून सावनीचा जळफळाट होतो.
वाचा: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर सामंथा रुथ प्रभूने केली पहिली पोस्ट, म्हणाली...
मुक्ता सागरवर असलेल्या प्रेमाची कबूली देणार असते. ती आरशामध्ये पाहून प्रॅक्टिस करत असते. तेवढ्यात आदित्य तेथे येतो आणि मुक्ताला आमच्या पप्पांना माझ्यापासून दूर करु नका असे म्हणतो. आता मुक्ता काय पाऊल उचलणार हे पाहण्यासारखे आहे.