'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता आणि सावनी या दोघीही सागरच्या बायका आहेत. सावनीला सागरने घटस्फोट दिला असला तरी आदित्यसोबत सध्या ती सागरच्या घरात राहात आहे. सावनीकडे पैसेच नाहीत त्यामुळे ती सागरकडे राहात आहे. पण तरीही सावनी सुधारत नाही. ती सतत काही ना काही करत असते. आता सावनीने थेट आदित्यची ढाल केली आहे. चला पाहूया मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?
मुक्ता रोज सईसाठी डब्बा बनवते. तो ती तिच्या बॅगेत भरते. आदित्य राहायला आल्यामुळे मुक्ता त्याच्यासाठी पण टिफीन बनवते. पण त्याला कळाले मुक्ताने बनवला आहे तर तो खाणार नाही. म्हणून सागर स्वत:ने बनवला आहे असे सांगतो. आदित्य तो टिफिन घेऊन जायला नकार देतो. पण सागर त्याला कसे बसे मनवतो. सावनी हे सगळं पाहात असते. ती मुक्ताजवळ येते आणि हा सगळा ड्रामा बंद कर असे मोठ्या आवाज बोलते. सुरुवातीला मुक्ता ऐकून घेते. नंतर ती सावनीला धमकी देते माझ्या घरात माझ्या नियमांनुसार राहायचे.
सावनीला मुक्ताचे वागणे आवडत नाही. पण तिचा बदला कसा घ्यायचे यासाठी ती आदित्यची ढाल करते. ती आदित्यला घेऊन जाणार असल्याचे सांगते. शेजारी असलेल्या एका चाळीत खोली पाहिली असून तेथे राहायला जाणार असल्याचे सांगते. खरं तर आदित्यसाठी तेथे राहायला जाणे योग्य नसल्यामुळे सागर तिला थांबवतो. पण सावनी एक अट ठेवते की मुक्ताला तिचे वागणे मान्य करावे लागणार. मुक्तावर स्पष्ट शब्दात माझ्या घराच्या मर्यादा ओलांडत नाहीस तो पर्यंत मी सगळं मान्य करेन असे बोलते.
वाचा: कतरिना कैफने रात्री 2 वाजता आलिया भट्टला मेसेज करून का मागितली मदत? वाचा काय झालं
सावनी सतत आदित्यच्या डोक्यात मुक्ताविषयी वाईट गोष्टी भरवत असते. जर आदित्य सागरशी नीट बोलायला लागला तर मुक्ता त्याला लांब करेल असे सावनी बोलत असते. पण आदित्य बिल्डींगखाली बसून रडत असतो. मुक्ता त्याच्या जवळ जाते. तेव्हा आदित्य तिला सांगतो की प्लिस मला माझ्या पप्पांपासून लांब करु नकोस, मला ते हवे आहेत. मला माझ्या घरातून पण बाहेर काढू नकोस असे तो बोलतो. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.