'प्रेमाची गोष्ट' मालिकेतस सागर कोळीची पूर्व पत्नी सावनी ही अखेर बॉयफ्रेंड हर्षवर्धनशी लग्न करणार आहे. हर्षवर्धनला हे लग्न जरी करायचे नसले तर सावनी त्याला सोडणार नाहीये. त्यामुळे त्याला नाईलाजाने लग्न करावे लागणार आहे. हर्षवर्धन तरीही अनेक कारणे सांगून टाळाटाळ करत आहे. पण याचा सावनीवर काही परिणाम होताना दिसत नाही. अशातच आता सावनीचे प्रेग्नंसी रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सतत काही ना काही घडत आहे. सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाच्या तयारीत मुक्ता आणि सागर मात्र जवळ येताना दिसत आहेत. सागर तर मुक्ताच्या प्रेमात पडला आहे. आज सागर मुक्तासमोर प्रेमाची कबुली देणार आहे. मुक्ताने सोफ्या ऐवजी बेडवर झोपावे म्हणून सागर सोफ्याचा पाय तोडतो. नंतर तो मुक्ताला बेडवर सोपण्यास सांगतो. नंतर सागर प्रेमाची कबुली देतो. पण तोवर मुक्ता झोपलेली असते.
वाचा: शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात का दाखल व्हावं लागलं?; त्यांनी स्वत:च दिली माहिती
आदित्य चिडलेला असतो. त्याला त्याची चित्रकलेची वही सापडत नसते. तो त्यासाठी सावनीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत असतो. पण सावनी मात्र हलायचे नाव घेत नसते. तेवढ्यात माधवी तेथे येते. ती आदित्यला काय झाले विचारते. ती आदित्याला त्याची वही शोधून देते आणि माधवी शोधत असलेला पाण्याचा ग्लास आदित्य तिला शोधून देतो. पण या सगळ्यात माधवीचा पाय घसतो आणि तिच्या हातातील पाण्याचा ग्लास झोपलेल्या सावनीच्या तोंडावर पडतो. उठल्यावर सावनी चिडते. पण आदित्य तिला समजावतो.
वाचा: हनीमूनला गेलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि जहीरचे झाले भांडण, समोर आला व्हिडीओ
सावनीला सकाळी झोपेतून उठल्यापासून उल्टा होत असतात. त्यामुळे ती प्रेग्नंसी चाचणी करते. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे सावनी खूप खूष असते. ती मुक्ताला बोलावते आणि तू डॉक्टर आहेस ना मग मला तपासून सांग असे म्हणते. त्यावर मुक्ता कधीकधी प्रेग्नंसी रिपोर्ट चुकीचे असतात असे बोलते. ते ऐकून सावनीला राग अनावर होतो. ती मुक्ताला वाटेल तसे बोलते. तेवढ्यात सागर तेथे येतो आणि सावनीला इथून पुढे माझ्या बायकोशी निट बोलायचे असे म्हणतो.
वाचा: कधीकाळी दोन वेळचे अन्नही मिळत नसणाऱ्या भारती सिंहकडे आज आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती