Premachi Goshta: मुक्ता आदित्यला दाखवणार सावनीचा खरा चेहरा, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय घडणार?-star pravah premachi goshta 30th august 2024 update ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: मुक्ता आदित्यला दाखवणार सावनीचा खरा चेहरा, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय घडणार?

Premachi Goshta: मुक्ता आदित्यला दाखवणार सावनीचा खरा चेहरा, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 30, 2024 03:30 PM IST

Premachi Goshta Update: छोट्या पडद्यावरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या सर्वांची मने जिंकत आहे. आता मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

premachi goshta
premachi goshta

छोट्या पडद्यावरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. सागर आणि मुक्तामध्ये चांगली जवळीक निर्माण झाली आहे. त्यांचे नाते योग्य वळणावर आले आहेत. पण सावनीला हे पाहावत नाही. ती सतत त्या दोघांच्या नात्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

लकीने आरतीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ताच्या क्लिनिकपासून आहे. मुक्ताच्या क्लिनिकमध्ये काम करणारी आरती ही लकीच्या प्रेमात पडली आहे. लकी हा आरतीला लाँग ड्रायवर घेऊन जातो. तिच्याशी चार प्रेमाच्या गोष्टी बोलतो. आरतीला लकी आवडू लागतो. पण लकी नेहमीप्रमाणे आरतीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आरतीचा बदललेला चेहरा पाहून मुक्ता तिला विचारते नेमकं काय सुरु आहे. त्यावर आरती तिला वेळ आल्यावर नक्की सांगेन असे बोलते. आता आरती मुक्ताला लकीविषयी कधी सांगणार? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

हर्षवर्धन मिहिकाला घेऊन जाणार पार्टीमध्ये

हर्षवर्धन सतत मिहिकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पण मिहिका त्याला काही करुन लांब करते. हर्षवर्धन मिहिकासाठी एक सुंदर साडी घेऊन येतो. तसेच तिला संध्याकाळी ही सुंदर साडी नेसून पार्टीमध्ये जायचे असल्याचे सांगतो. पण मिहिकाने हर्षवर्धनने आणलेली साडी फेकून दिली. तसेच पार्टीमध्ये येणार नसल्याचे सांगितले आहे. हर्षवर्धन मिहिकाला थेट धमकी देतो. तसेच या पार्टीला सगळे मोठे उद्योगपती येणार असल्याचे देखील सांगते. मिहिकाला या पार्टीत मुक्ता आणि सागर येणार असल्यामुळे जायला तयार होते.
वाचा: ‘तारक मेहता...’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!

मुक्ता आदित्यला दाखवणार खरा चेहरा

सावनीला खऱ्या हिऱ्यांचे कानातले हवे असतात गिफ्ट म्हणून. सागर खोटे कानातले घेऊन सावनीला देतो. जेव्हा सावनीला याविषयी कळते तेव्हा ती चिडते. ती सर्वांना धमकी देते जर आदित्यला कळाले तर तो किती वाईट वाटेल हे सांगते. त्यानंतर सावनी चिडते आणि जर तुमचे इतकेच आदित्यवर प्रेम आहे तर हे घर त्याच्या नावावर कर असे बोलते. सागर चिडतो. पण मुक्ता मात्र शांतपणे बोलते की आदित्यसाठी हा एक कागदाचा तुकडा महत्त्वाचा आहे का. ते ही करु. त्यानंतर मुक्ता बेडरुममध्ये जाते आणि आदित्यसमोर सावनीचा खरा चेहरा आणणे गरजेचे आहे हे देखील बोलते. आता त्यासाठी मुक्ता काय करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.