मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुक्ताला कळाला हर्षवर्धनचा प्लान, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीला कोळी कुटुंबीय करणार का मदत?

मुक्ताला कळाला हर्षवर्धनचा प्लान, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीला कोळी कुटुंबीय करणार का मदत?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 11, 2024 11:39 AM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आता हर्षवर्धनचा प्लान मुक्ताला कळाला आहे. त्यामुळे मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार जाणून घ्या...

premachi goshta: हर्षवर्धनने आखला नवा प्लान
premachi goshta: हर्षवर्धनने आखला नवा प्लान

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनीने पाहिलेले एक स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसत आहे. तिला कित्येक वर्षांपासून हर्षवर्धनशी लग्न करायचे होते आणि आता ते स्वप्न सत्यात उतरले आहे. ती लग्नाची तयारी करत असताना हर्षवर्धनने नवा प्लान आखला आहे. तो प्लान आता मुक्ताला कळाला आहे. त्यानंतर मुक्ता काय करणार हे जाणून घ्या...

ट्रेंडिंग न्यूज

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागची सुरुवात ही मिहिर आणि मिहिकाच्या लग्नाच्या तयारीने होते. हर्षवर्धनला सावनीशी लग्न करायचे नसते. त्यामुळे तो सावनीपासून लांब कसे जाता येईल याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तो सावनीला लग्नाची तयारी करण्यासाठी मिहिरच्या घरी राहायला जा असे सांगत असतो. सावनी लग्नाची तयारी करत असते त्यामुळे ती पटकन जाण्यासाठी तयार होते.
वाचा: बॉलिवूड अभिनेत्रीने संपवले स्वत:चे आयुष्य, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

मिहिकाने बनवला शिरा

मिहिरसाठी मिहिका शिरा बनवायला घेते. तिला पिवळ्या रंगाचा केशराचा शिरा बनवायचा असतो. पण मिहिकाने आजवर कधीही बनवलेला नसतो. त्यामुळे तिला माहिती नसते शिरा बनवता पिवळा रंग कसा आणयचा. ती हळद टाकायचे ठरवते. तेवढ्यात मिहिर येतो आणि तिची खिल्ली उडवतो.

माधवी मुक्तावर चिडली

मिहिरचे घर छोटे असल्यामुळे त्याला सावनीला स्वत:च्या घरी घेऊन जाता येत नाही. तो त्याची अडचण मुक्ता आणि सागरला सांगतो. तेव्हा मुक्ता सावनीला स्वत:च्या घरी आणण्याचा निर्णय घेते. पण माधवीला हे मान्य नाही. ती मुक्तावर चिडते. पण मुक्ता माधवीला समजावते. सावनी ही मिहिकाची नणंद आहे. त्यामुळे त्यांना तिच्याशी चांगले वागावेच लागणार.
वाचा: किडनॅप झालेले अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे सापडले! कुठे आणि कसे जाणून घ्या सविस्तर

मुक्ताला कळाला हर्षवर्धनचा प्लान

मुक्ता हर्षवर्धनला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली असते. लग्नासंदर्भात बोलण्यासाठी मुक्ता तेथे जाण्याचा निर्णय घेते. पण जेव्हा मुक्ता तेथे पोहोचते तेव्हा हर्षवर्धन फोनवर बोलत असतो. तो कोणत्या तरी मुलीला सांगत असतो की त्याला सावनीशी लग्न करायचे नाही. तो सावनीला सोडून त्या मुलीकडे जाणार हे मुक्ताला कळते. त्यामुळे मुक्ता सागरला सांगून सावनीची मदत करण्याचा निर्णय घेते. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Avadhoot Gupte Mother Died: अवधूत गुप्तेवर कोसळला दु:खाचा डोंगर, उपचारादरम्यान आईचे निधन

टी-२० वर्ल्डकप २०२४