छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांचा धुमाकूळ सुरु आहे. वेगवेगळ्या विषयावर एकापाठोपाठ एक अशा नव्या मालिका येताना दिसत आहेत. आता स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याते दिसत आहे. या मालिकेचे नाव 'येडं लागलं प्रेमाचे' असे आहे. आता या नव्या मालिकेमुळे कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
काही दिवसांपूर्वी ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या प्रमोच्या माध्यमातून मालिकेची वेळ आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. या नव्या मालिकेत बिग बॉस मराठी विजेता विशाल निकम आणि पूजा बिरारी ही फ्रेश जोडी झळकणार असल्याने मालिकेबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच आता या मालिकेचा दुसरा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या बैलगाडा शर्यतीचा थरार या प्रोमोमध्ये दाखवण्यात आला आहे.
वाचा: “गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ‘ही’ अभिमान गीते
‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत बैलगाडा शर्यतीचा थरार दाखवल्यामुळे नेटकऱ्यांनी मालिकेच्या टीमचे तोंडभरुन कौतुक केले आहे. तसेच मालिकेत राया आणि मंजिरीची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. नानांवरचे कर्ज हलके करण्यासाठी मंजिरी बैलगाडा शर्यतीत सहभागी होते. शर्यत सुरू होण्याआधी देवाची प्रार्थना करून मंजिरी तिच्या दोन्ही बैलांना नमस्कार करताना दिसते. ही सगळं पाहून काही केल्या शर्यत तू जिंकणार नाहीस असे राया मंजिरीला बोलत असतो. शर्यत सुरू झाल्यावर मंजिरीच्या बैलगाडीचे चाक नेमके चिखलात अडकते. ते पाहून राया तिच्याकडे येतो आणि तिला चाक बाहेर काढून देतो. त्यानंतर तुझ्यावर उपकार म्हणून नाहीतर हा सामना बरोबरीचा झाला पाहिजे म्हणून मदत केल्याचे तो मंजिरीला सांगतो. आता नेमकी शर्यत कोण जिंकणार हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
वाचा: घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा
सोशल मीडियावर या नव्या मालिकेचा प्रोमो तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या मालिकेचे कौतुक केले आहे. एका यूजरने “प्रोमोच्या बाबतीत स्टार प्रवाहच्या टीमचा कोणीच हात धरू शकत नाही. उत्तम खूप छान” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “असाही प्रोमो येऊ शकतो याचा विचार पण नाही केला” असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने "विशाल दादा म्हणजे विषय खोल आहे…” असे म्हटले आहे. सध्या सर्वजण या मालिकेची वाट पाहात आहेत हे स्पष्ट होत आहे.
वाचा: 'लोकांना लाज का वाटत नाही', इंटीमेट सीनवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीने सुनावले
संबंधित बातम्या