मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  राहुलचा डाव अपयशी, कलाने शोधून काढले नैनाला! 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत वेगळे वळण

राहुलचा डाव अपयशी, कलाने शोधून काढले नैनाला! 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत वेगळे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
May 08, 2024 03:00 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. राहुलला नैनाशी लग्न करायचे नव्हते. त्यामुळे त्याने नवा डाव अखला आहे. पण कलाने त्याचा हा डाव अपयशी ठरला आहे.

राहुलचा डाव अपयशी, कलाने शोधून काढले नैनाला! 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत वेगळे वळण
राहुलचा डाव अपयशी, कलाने शोधून काढले नैनाला! 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत वेगळे वळण

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. मालिकेत नैना आणि राहुलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. पण राहुलला हे लग्न करायचे नसते. त्यामुळे तो नैनाचे अपहरण करतो. आता कला नैनाला शोधण्यासाठी निघाली आहे. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आजच्या भागात काय होणार जाणून घ्या...

ट्रेंडिंग न्यूज

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात राहुल आणि नैनाच्या लग्नासाठी सर्वजण एकत्र जमतात. राहुल नैनाला आणण्यासाठी गाडी पाठवते. पण गाडीच्या ड्रायव्हरला वेळेत पोहोचू नको असे सांगते. तसेच नैनाचे तो अपहरण देखील करतो. एका गाडीमध्ये नैनाचे आई-वडील आणि बहिण बसतात. दुसऱ्या गाडीत नैना बसते. एक गाडी चांदेकरांच्या घरी पोहोचते. पण नैनाची गाडी गायब होते. ड्रायव्हर तिला गोडावनमध्ये कोंडून ठेवतो.
वाचा: बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल

राहुलच्या आईने दिला ४५ मिनिटांचा कालावधी

नैना मांडवात पोहोचली नाही म्हणून सर्वजण चिंता करतात. असेही राहुल आणि त्याच्या आईला हे लग्न होऊच नये असे वाटते. त्यामुळे दोघे एक डाव आखतात. राहुल नैनाचे अपहरण करतो जेणे करुन ती मांडवात पोहोचणार नाही. तर दुसरीकडे त्याची आई ४५ मिनिटांची वेळ सगळ्यांना देते. जर नैना ४५ मिनिटांमध्ये मांडवात पोहोचली नाही तर हे लग्न होणार नाही असे स्पष्ट सांगते. त्यामुळे कलाच्या आई आणि वडिलांना मोठा धक्का बसतो. नैना नेमकी कुठे गेली असा प्रश्न त्यांना पडतो.
वाचा: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप

कला आणि अद्वैतने शोधले नैनाला

नैना गोडावनमध्ये फोनला रेंज शोधत असते. कसं बसं करुन ती कलाला फोन करते. पण तिचे काहीच ऐकू जात नाही. कलाला थोडी शंका येते की नैना ताई कोणत्या तरी अडचणीमध्ये आहे. त्यामुळे ती अद्वैतला घेऊन तिला शोधायला निघते. ती सतत तिला फोन करत असते. पण फोन काही लागत नाही. शेवटी कलाला एका गोडावन बाहेर त्यांची गाडी दिसते. ते आसपास नैनाचा शोध घेतात. तेवढ्यात कला पुन्हा एकदा नैनाला फोन करते. तेव्हा फोनच्या रिंगचा आवाज हा गोडावन मधून येत असल्याचे कळते. कला आणि अद्वैत कसेबसे नैनाला शोधून काढतात. नैना त्यांना घडलेला प्रकार सांगते. त्यानंतर ते वेळेत नैनाला घेऊन मांडवात पोहोचतात. त्यांनंतर नैना आणि राहुलचे लग्न पार पडते. आता राहुल नैनाशी कसा वागणार? त्याते सत्य सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर त्यांना मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहे.
वाचा: मुंबईत मराठी माणूस चालणार नाही?; दिग्दर्शक अक्षय इंडिकर याची संतप्त पोस्ट व्हायरल

IPL_Entry_Point