मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  साखरपुडा मोडण्यासाठी राहुलने नैनाचे केले अपहरण, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय असेल कलाचे पुढचे पाऊल?

साखरपुडा मोडण्यासाठी राहुलने नैनाचे केले अपहरण, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय असेल कलाचे पुढचे पाऊल?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 06, 2024 01:08 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत राहुल आणि नैनाचा साखरपुडा होणार आहे. पण राहुलने तो मोडण्यासाठी नैनाचे अपहरण केले आहे. आता मालिकेत पुढे काय होणार जाणून घ्या..

साखरपुडा मोडण्यासाठी राहुलने नैनाचे केले अपहरण, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय असेल कलाचे पुढचे पाऊल?
साखरपुडा मोडण्यासाठी राहुलने नैनाचे केले अपहरण, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय असेल कलाचे पुढचे पाऊल?

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत अद्वैत आणि कलाची कथा दाखवण्यात आली आहे. अद्वैत हा चांदेकर कुटुंबातील श्रीमंत मुलगा आहे. तर कला ही अतिशय गरीब घरातून आली आहे. त्या दोघांचे नियतीने लग्न लावून दिले. पण त्यांची तू तू मैं मैं न थांबणारी आहे. कलाची बहिण नैना आणि अद्वैतचा भाऊ राहुल यांचा साखरपुडा होणार आहे. पण दोघेही या सारखपुड्यासाठी प्रयत्न करत आहे. पण राहुलला हा साखरपुडा करायचा नसल्यामुळे तो मोडता कसा येईल याकडे त्याचे आणि रोहिणीचे लक्ष आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात कला ही नैनासाठी रुखवत तयार करते. तसेच साखरपुड्याची चांदेकर जोरदार तयारी करतात. कलाने तयार केलेली रुखवत ठेवलेली असते. ती अद्वैतला देखील आवडते. ती रुखवत तो सर्वांसमोर मांडण्यास सांगतो.
वाचा: 'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

कलाने अद्वैतचे मानले आभार

कला साखरपुड्यासाठी नटून थटून तयार होते. अशातच अद्वैतने रुखवत सर्वांसमोर मांडायला सांगितली असल्यामुळे ती त्याच्या खोलीमध्ये जाऊन आभार मानते. कला इतकी सुंदर दिसत असते हे पाहून अद्वैत तिला सुंदर दिसते असे म्हणतो. पण कलाला ते थोडे वेगळे वाटते. ती पुन्हा अद्वैतला विचारते तू काय म्हणाला. तेव्हा अद्वैत तिला उत्तर देतो की तू आभार मानताना सुंदर दिसते. त्यानंतर कला पुन्हा त्यालाच ऐकवून तेथून निघून जाते.
वाचा: ‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

राहुलने नैनाचे केले अपहरण

नैना ही गरोदर असल्यामुळे राहुलला तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडण्यात येते. पण त्याला तिच्याशी लग्न करायचे नसते. त्यामुळे तो मोठा प्लान करतो. नैना साखरपुड्यासाठी कशी पोहोचणार नाही याची सोय करतो. तो नैनाचे अपहरण करतो. तिला एका खोलीत कोंडून ठेवतो. नैना साखरपुड्यासाठी पोहोचली नाही म्हणून सर्वजण चिंता व्यक्त करत असतात. रोहिणी ही संधी साधून पुढच्या ४५ मिनिटात ती आली नाही तर हे लग्न होणार नाही असे बोलते. दुसरीकडे अद्वैत कलाला सुनावतो. तो या लग्नासाठी प्रयत्न करत असताना नैनाने हे जर मुद्दाम केले असेल तर तिला याची शिक्षा मिळेल असे तो बोलतो.
वाचा: 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या

IPL_Entry_Point