'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत कला आणि अद्वैतमध्ये रोज काही तरी नवीन भांडण सुरु असते. त्यांची भांडणे संपायचे काही नावच घेत नाहीत. त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण होणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेऊया...
कला आणि नैनाच्या लग्नात त्यांच्या आई-वडिलांना कर्ज घ्यावे लागले होते. पण लग्नानंतर कर्जाचे अफ्ते फेडता न आल्यामुळे कलाची गाडी बँकवेले घेऊन जातात. कलाचे वडील हमालीचे काम करतात. तर आई पापडाचा व्यवसाय करत आहे. काजोल तिला या सगळ्यात मदत करत आहे. पण त्यांनी याबाबत कलाला जराही भनक लागू दिली नाही.
वाचा: "दोन मनाच्या दोन दिशा अन एक हळवी वाट...", ‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत ऐकलेत का?
कला आबांच्या गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन अद्वैतकडे जाते. त्याला सांगते माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी तुला हे प्रिस्क्रिप्शन देतेय. आबांच्या गोळ्या घेऊन ये. ते ऐकून अद्वैतला दवाखान्यात घडलेला प्रकार आठवतो. कलाकडे उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ती हातातल्या सोन्याच्या बांगड्या हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर काढून ठेवते. ते अद्वैत पाहातो आणि त्याला कालासाठी बँकेत खाते उघडायचे असते. पण कलासाठी खाते कसे उघडणार म्हणून तो घरातील सर्वांच्या नावाची खाते उघडायचा प्रस्ताव आबांसमोर ठेवतो. रजनी, कला यांना घरखर्चाला लागणारे पैसे खात्यात देता येतील आणि ते त्यांना दरवेळी मागायला नको असे देखील पटवून देतो. आबा लगेच तयार होतात.
वाचा: 'दुनियादारी २' येणार? अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरच्या नव्या चित्रपटाची घोषणा
कला रिक्षामधून जात असताना तिला तिचे बाबा दिसतात. ते हमाली करत असल्याचे पाहून कलाला धक्का बसतो. ती थेट बाबांना घेऊन घरी जाते. आई आणि वडिलांना मला हे का सांगितले नाही याचा जाब विचारते. त्यावर कलाची आई, जर तुला सांगितले असते तर तू सगळं सोडून आली असती असे उत्तर देते. दुसरीकडे कला बराच वेळ आली नसल्यामुळे चांदेकरांच्या घरी गैरसमज होतात. सरोज या संधीचा फायदे घेते आणि ती मुलगी बेजबाबदार असल्याचे म्हटले. आता अद्वैत सत्याचा शोध घेणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मालिकेच्या येत्या काळात सर्वांना सत्य कळणार आहे.
वाचा: नैनाचे सत्य कला आणणार का सर्वांसमोर? 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?
संबंधित बातम्या