नैनाचे सत्य कला आणणार का सर्वांसमोर? 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नैनाचे सत्य कला आणणार का सर्वांसमोर? 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?

नैनाचे सत्य कला आणणार का सर्वांसमोर? 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jun 05, 2024 01:44 PM IST

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत कला आणि नैना एकाच घरात नांदत आहेत. पण नैनाने खोट्या गोष्टींचा आधार घेत चांदेकरांची सून होण्याचा मान मिळवला आहे. आता कला तिचे सत्य सर्वांसमोर आणणार का? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

laxmichya paulanni: कला आणणार नैनाचे सत्य सर्वांसमोर
laxmichya paulanni: कला आणणार नैनाचे सत्य सर्वांसमोर

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत कला आणि अद्वैत हे दोघेच चांदेकर मॅन्शनमध्ये आहेत. घरातील इतर सदस्य हे देवदर्शनाला गेले आहेत. अशातच मध्यरात्री आयस्क्रीम खाल्ल्यामुळे अद्वैतला अस्थमाचा अटॅक येतो आणि कलाची धावपळ होते. ती कसंबसं अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि त्याच्यावर उपचार करते. आता अद्वैतला डिस्चार्ज मिळाला आहे. त्याला कला घरी घेऊन आली असून त्याची काळजी घेताना दिसते.

अद्वैतला लहानपणापासून आहे दम्याचा त्रास

अद्वैतला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कला त्याची काळजी घेताना दिसते. ती घरी आल्यावर त्याला असा त्रास का झाला? असा प्रश्न विचारते. त्यावर हा त्रास लहानपणापासून आहे. तसेच वातावरण बदलले, थंड खाले किंवा धुळीत गेलो की हा त्रास होतो असे अद्वैत सांगतो. त्यानंतर कला त्याला खिचडी का खाल्ली नाही असा जाब विचारते. तसेच आयस्क्रीम खाल्ले नसते तर हा त्रास झाला नसता असे देखील म्हणते.
वाचा: अभिनेत्री अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडेचे झाले अपहरण? काय आहे प्रकरण जाणून घ्या

देवदर्शनावरुन चांदेकर कुटुंबीय परतले

चांदेकर कुटुंबीय देवदर्शनाला गेले होते. ते सगळेजण परत येतात. सरोजला अद्वैतच्या प्रकृतीविषयी कळते. त्या या सगळ्यात कलाचा दोष असल्याचे बोलतात. कलाने आयस्क्रीम दिले नसते तर असे झालेच नसते. तुझ्या जीवावर मी अद्वैतला सोडून जायला नको होते असे बोलते. तेवढ्यात अद्वैत खाली येतो आणि कलाला काही बोलू नको असे म्हणतो. उलट कलाला काही बोलू नका तिच्यामुळे माझा जीव वाचला हे तो सांगतो.
वाचा: अभिनेते अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून आवाज का देतात? जाणून घ्या

नैना घेणार ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये

नैनाला पहिल्यापासून ब्यूटी कॉम्पिटीशनमध्ये सहभागी व्हायचे असते. तिला 'कोल्हापूर ब्यूटी कॉन्टेस्ट'ची जाहिरात दिसते. ही स्पर्धा चार महिन्यांनंतर असते. त्यामुळे नैना सगळ्या तयारीला लागते. तेवढ्यात नैनाला तिचा आधीचा बॉयफ्रेंड सौरभ फोन करतो. नैना त्याला उडवाउडवीची उत्तरे देते. तसेच त्याला लवकरच राहुलला घटस्फोट देणार असल्याचे सांगते. नैनाचे ब्यूटी कॉन्टेस्टचे लेटर घरी येते आणि ते कलाच्या हाती लागते. कलाला प्रश्न पडतो की नैनाला प्रेग्नंट असल्याचा विसरल पडला आहे की ती स्वत:ला सिद्ध करुन दाखवण्यासाठी हे करत आहे. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: निकालापूर्वीच 'या' खानने केले पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन, पोस्ट व्हायरल

Whats_app_banner