स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेने सर्वांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अद्वैत आणि कला ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता मालिकेत एक थोडे वेगळे वळण आले आहे. चांदेकर कुटुंबीय देवदर्शनाला गेले असता घरी असलेल्या अद्वैतची अचानक प्रकृती बिघते. आता कला काय करणार चला पाहूया...
अद्वैतला अस्थमाच्या अटॅक आल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करताना लागणारे पैसे हे कलाकडे नसतात. तिच्या खात्यामध्ये केवळ ५०० रुपये शिल्लक असतात. ती डॉक्टरांना विनंती करते. स्वत:च्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून देते. पण तरीही अद्वैतवर उपचार करायला सगळे नाही म्हणतात. शेवटी बोलताना चुकून कलाच्या तोंडून अद्वैत चांदेकर असे नाव निघते. ते ऐकून त्याला रुग्णालयात दाखल केले जाते. त्याच्यावर उपचार सुरु होतात.
वाचा: सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी करतोय रोमॅन्स, नेमकी काय आहे भानगड जाणून घ्या ?
चांदेकर कुटुंबीय देवदर्शनाला निघाले असताना आबा आणि सोहम बसलेली गाडी बिघते. काजूने सोहमला गाडी कशी रिपेअर करायची हे दाखवले असते. त्यामुळे सोहम ती गाडी रिपेअर करतो. ते पाहून आबा चकीत होतात. सोहम मित्रांकडून बरेच काही शिकत असल्याचे पाहून सर्वजण आनंदी असल्याचे पाहायला मिळते. पण अद्वैतची आई अद्वैतला सतत फोन करताना दिसत आहे. अद्वैत फोन उचलत नसल्यामुळे चिंता वाटत आहे.
वाचा: मल्लिकाजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सने केली 'हिरामंडी २'ची घोषणा
कलाच्या आईने देवापुढे लावलेला दिवा अचानक विझतो. त्यामुळे तिला भीती वाटू लागते. माझ्या दोन्ही मुली ठीक तर आहेत ना. त्या काजूला उठवतात आणि कलाकडे जाऊन येण्यास सांगतात. पण काजू चांदेकरांकडे जाणार नाही असे सांगते. कारण कला आणि अद्वैत दोघेच घरी असतात. आता जेव्हा सगळ्यांना अद्वैतच्या प्रकृतीविषयी कळेल तेव्हा काय होणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
वाचा: सलमान खानशी लग्न करायला फार्म हाऊसमध्ये शिरली २४ वर्षांची तरुणी! पुढं काय झालं पाहा!
संबंधित बातम्या